भिवंडी: भिवंडी महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले असून महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपने आपला उमेदवार बदलला आहे.भाजपने यापूर्वी नारायण चौधरी यांना भाजपचे महापौर पदाचा अधिकृत उमेदवार घोषित केले होते. नारायण चौधरी यांनी भाजप कडून महापौर पदासाठी चा आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.मात्र महापौर पदाच्या निवडणुकीला बुधवारी वेगळेच वळण लागले असून, भाजपचे भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांनी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे.त्यासंदर्भातील लेखी पत्र भाजप शहराध्यक्षांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांना दिले आहे. भाजपने आता स्नेहा मेहुल पाटील यांची महापौर पदाची अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष रविकांत सावंत यांनी दिली आहे.
Web Summary : In a sudden turn, Bhiwandi BJP replaced its mayoral candidate Narayan Choudhary with Sneha Mehul Patil just before the election. The city president announced Patil's candidacy via letter to corporators.
Web Summary : भिवंडी भाजपा ने अचानक यू-टर्न लेते हुए महापौर चुनाव से ठीक पहले नारायण चौधरी की जगह स्नेहा मेहुल पाटिल को अपना उम्मीदवार बनाया। शहर अध्यक्ष ने पार्षदों को पत्र के माध्यम से पाटिल की उम्मीदवारी की घोषणा की।