शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिकेचा १,१७९ कोटींचा अर्थसंकल्प; विशेष महासभेस मोजकेच नगरसेवक हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:24 IST

विशेष चर्चा होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : भिवंडी महापालिकेचा १,१७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा २०२६ - २०२७ चा अर्थसंकल्प मनपा आयुक्त अनमोल सागर यांनी मंगळवारी विशेष महासभेत महापौर नारायण चौधरी यांना सादर केला.  विशेष म्हणजे या विशेष महासभेस काही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

आयुक्तांनी ठळक तरतुदी असलेल्या प्रस्तावनेचे वाचन करत  २० मिनिटांमध्येच विशेष सभा तहकूब केली. ३० मार्चला अर्थसंकल्पावर विशेष  चर्चेसाठी महासभा होणार असल्याचे महापौर चौधरी म्हणाले आयुक्तांनी २०२५-२६ चे सुधारित व २०२६-२७ मूळ अर्थसंकल्प मंजुरी करिता सादर केला. २०२५ - २०२६ चे १.११७ कोटी ५२ लाख ५४ हजारांचा सुधारित अर्थसंकल्प व २०२६ - २०२७ चे ७३ लाख ९६ हजार शिलकीचा १,१७९ कोटी १० लाख ९७ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

पाणीपुरवठ्यासाठी १०५ कोटींची तरतूद

महिला व बालकल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण या तीन विभागांसाठी मूळ अर्थसंकल्पातून महसुली उत्पन्नातून बांधीव खर्च वजा करून उर्वरित उत्पन्नाच्या ५ टक्के नुसार ३ कोटी २६ लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात उत्पन्न कमी व खर्च अधिक असल्याने पाणीपुरवठ्यासाठी १०५ कोटी १४ लाख ९१ हजार तर शिक्षण विभागासाठी ७६ कोटी ११ लाख २६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात विविध विभागांतर्गत तरतूद केली असल्याचे आयुक्तांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi Municipal Corporation Announces ₹1,179 Crore Budget; Few Councilors Attend.

Web Summary : Bhiwandi Municipal Corporation's Commissioner presented a ₹1,179 crore budget for 2026-27. Water supply gets ₹105 crore. Education gets ₹76 crore. A special meeting with few corporators was adjourned, with further discussion planned.
टॅग्स :BhiwandiभिवंडीBudgetअर्थसंकल्प २०२६