VIDEO: हातगाडीला बसची जोरदार धडक; फेरीवाला १० फूट लांब उडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:57 IST2021-01-04T20:57:01+5:302021-01-04T20:57:25+5:30
बसच्या मागील चाकाची धडक बसल्यानं फेरीवाला गंभीर जखमी

VIDEO: हातगाडीला बसची जोरदार धडक; फेरीवाला १० फूट लांब उडाला
भिवंडी: भिवंडी शहरात कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका मार्गावर रस्त्याचे कामे संथगतीने सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत आहे. त्यातच सध्या शहरात मेट्रोचे रस्ता काँक्रिटकरणाचे काम सुरु असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भिवंडीत बसच्या मागील चाकाची हातगाडीला धडक; फेरीवाला गंभीर जखमी https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/s0PqC9jo2B
— Lokmat (@MiLOKMAT) January 4, 2021
रविवारी सायंकाळच्या सुमाराला वांजरपट्टी नाका येथील पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने हातगाडी घेऊन जाणाऱ्याला समोरून येणाऱ्या फेरीवाल्याला बसच्या मागील चाकाची जोरदार धडक बसली. या धडकेत हातगाडी चालक १० फूट लांब फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या घटनेच्या माहितीसाठी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता आमच्याकडे या घटनेची माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.