भिवंडीतील कचरा घंटागाडी संपावर, नगरसेवकाने कचरा फेकला मुख्यालय प्रवेशद्वारावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:21 PM2020-07-29T17:21:18+5:302020-07-29T17:22:42+5:30

काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी बुधवारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह येत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.

Bhiwandi garbage bell strike, the corporator threw garbage at the entrance of the headquarters | भिवंडीतील कचरा घंटागाडी संपावर, नगरसेवकाने कचरा फेकला मुख्यालय प्रवेशद्वारावर

भिवंडीतील कचरा घंटागाडी संपावर, नगरसेवकाने कचरा फेकला मुख्यालय प्रवेशद्वारावर

Next

नितीन पंडित

भिवंडी - भिवंडी शहरातील कचरा उचलण्याचे काम खासगी घंटागाडी ठेकेदार यांच्यामार्फत करण्यात येत असून, त्यांचे फेब्रुवारीपासूनचे देयक बिले महानगरपालिका प्रशासनाने न दिल्याने त्रस्त खासगी घंटागाडी ठेकेदारांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिल्याने संतप्त काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी बुधवारी 12 वाजेच्या सुमारास आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह येत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कचरा फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.

भिवंडी शहरात मागील 2014 पासून शहरात दररोज जमा होणारे सुमारे 400 मेट्रिक टन कचरा उचलण्याचे काम खासगी वाहन ठेकेदारांनी पुरविलेल्या घंटागाडी मार्फत करण्यात येत असून , त्यांना फेब्रुवारी 2020 पासून तब्बल पाच महिन्याचे पैसे महानगरपालिका प्रशासनाने न दिल्याने या ठेकेदारांनी बुधवारी सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिला आहे.

शहरातील कचरा उचलण्यासाठी तब्बल 93 घंटागाडी 15 जेसीबी व 49 डंपर हे भाडे तत्वावर पुरविण्यात आले असून यांना 2010 च्या जिळ दरपत्रक सूचनेनुसार घंटागाडीस प्रतिदिन 1197 तर त्यावरील कामगारास अवघे 297 रुपये मेहनताना दिला जात असून तुटपुंज्या मानधनात आम्ही काम करीत असताना सध्याच्या कोरोना संकट काळात ही आमच्या कामगारांनी जीव धोक्यात घालून सेवा बजावली असताना व घाण कचरा व्यवस्थापना साठी चा निधी उपलब्ध असताना वाहन ठेकेदारांची बिले जाणूनबुजून अडवून ठेवली जात असल्याने आम्हाला काम बंद आंदोलन करावे लागले असे वाहन ठेकेदार यांनी नाव न सांगण्याचा अटी वर माहिती दिली.

दरम्यान या घंटागाडी ठेकेदारांकडून मागील कित्येक दिवसांपासून बिला साठी तगादा लावला जात असताना मागे पंधरा दिवसां पूर्वी सुध्दा काम बंद केले होते त्यावेळी मनतमवरी करून काम सुरू करण्यास भाग पाडले परंतु पुन्हा प्रशासन त्यांचे बिल देत नसल्याने त्यांच्या काम बंद आंदोलना मुळे शहरातील कचऱ्याची समस्या जटिल होत असल्याने संतप्त काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर आपल्या सोबत आणलेला कचरा ओतून आपला संताव व्यक्त केला आहे.

घाण कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र निधी असताना प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना पैसे न देण्याने शहरातील नागरिकांना नाहक कचऱ्याच्या दुर्गंधीचा समान करावा लागत असून , कचरा न उचलल्याने नागरीकांना साथी च्या आजारांचा सुध्दा सामना करावा लागू शकतो व सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग काळात ते नागरीकांसाठी घटक असल्याने आपण प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी कचरा मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारा फेकला असल्याची महिती काँग्रेस नगरसेवक फहाद बाबा बाउद्दीन यांनी दिली आहे.

दरम्यान दुपारी या समस्येवर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत घंटागाडी ठेकेदारांना तात्काळ एक महिन्याचे पैसे अदा करून काम सुरू करण्याचे सांगण्यात आले असून, त्यानुसार ठेकेदारांनी काम बंद आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक अशोक संख्ये यांनी दिली आहे.

Web Title: Bhiwandi garbage bell strike, the corporator threw garbage at the entrance of the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.