गरजूंना पडतोय भुर्दंड रुग्णवाहिकेचा खर्च, भार्इंदरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:06 AM2018-06-04T03:06:08+5:302018-06-04T03:06:08+5:30

सरकारच्या रूग्णवाहिकेसाठी १०८ क्र मांक सतत लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने गरजू रूग्णांना नाईलाजाने अन्य रु ग्णवाहिकांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचा प्रकार भार्इंदरमध्ये घडला आहे.

Bharundan Ambulance Expenditure, Bhindinder's Type | गरजूंना पडतोय भुर्दंड रुग्णवाहिकेचा खर्च, भार्इंदरमधील प्रकार

गरजूंना पडतोय भुर्दंड रुग्णवाहिकेचा खर्च, भार्इंदरमधील प्रकार

Next

भार्इंदर : सरकारच्या रूग्णवाहिकेसाठी १०८ क्र मांक सतत लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने गरजू रूग्णांना नाईलाजाने अन्य रु ग्णवाहिकांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचा प्रकार भार्इंदरमध्ये घडला आहे.
गोल्डन नेस्ट येथे राहणाऱ्या उर्मिला गुप्ता यांना पती रवींद्र याने शनिवारी बेदम मारहाण केली. पतीच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून उर्मिलाने आपल्या माहेरच्यांना घटनेची माहिती दिली. जखमी उर्मिलासह तिचे माहेरचे नातलग व सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी नवघर पोलीस ठाणे गाठले.
जबर मार लागलेल्या उर्मिला यांना सतत उलटी व चक्कर येत असल्याने महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रु ग्णालयात नेले. तेथे डॉक्टरने सिटी स्कॅन करावा लागेल व त्यासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात तातडीने न्या असा सल्ला दिला. नाईक यांनी सरकारच्या १०८ क्र मांकावर रुग्णवाहिकेसाठी संपर्कसाधला. पण सतत कॉल करूनही कोेणताच प्रतिसाद मिळाला नाही. सुमारे पाऊण तास वाट पाहून अन्य रुग्णवाहिका पाहणे सुरु केले. खाजगी रुग्णवाहिकेसाठी बाराशे रुपये शुल्क सांगण्यात आले. शेवटी महापालिकेची रुग्णवाहिका घेतली. त्यासाठी त्यांना साडेतीनशे रुपये शुल्क भरावे लागले.
गरजू वा अत्यवस्थ रुग्णांना जर १०८ क्रमांकाची विनामूल्य रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल करत नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
या प्रकरणी आपण तक्र ार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. रूग्णालयातील अन्य लोकांनीही सरकारी रूग्णवाहिकेचा असाच अनुभव असल्याने अन्य रु ग्णवाहिका पैसे भरून घ्यावी लागत असल्याचे सांगितले असे त्या म्हणाल्या.

Web Title: Bharundan Ambulance Expenditure, Bhindinder's Type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे