शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

भार्इंदर-वसई अंतर ३० किमीने कमी करणाऱ्या १०८२ कोटी खर्चाच्या खाडीपुलास मुहूर्त सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:22 IST

मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.

- नारायण जाधव ठाणे : मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.या पुलावर एमएमआरडीए १०८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार आहे. त्याचा फायदा आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणा-या लाखो वाहनचालकांना होणार आहे. खाडीवरील ५ किमी लांबीचा हा पूल ३०.६ मीटर रुंद असा सहा पदरी असणार आहे. पुलाच्या बांधकामात खारफुटी आणि मिठागरांसह पाणजू बेटांवरील काही रहिवाशांचा अडथळा होता. त्यावर मात करून एमएमआरडीएने त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा आल्यावर त्याबाबत निर्णय होणार आहे.हा पूल दोन्ही बाजूंना १४.३ मीटर रुंदीत तीनपदरी लेनद्वारे भार्इंदर आणि नायगांवदरम्यानच्या पश्चिम रेल्वे पुलाच्या समांतर तो बांधला जाणार आहे. तसेच तो पुढे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ८ला जोडला जाणार आहे.>वेळेसह कोट्यवधींच्या इंधनाची बचत होणार : सध्या मीरा-भार्इंदरहून वसई येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हाच एकमेव पर्याय आहे. काशिमीरा मार्गे वसईला जाण्यासाठी घोडबंदर रस्त्याने जेएनपीटीहून गुजरातकडे जाणाºया हजारो कंटेनरच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडीला सामारे जावे लागते. यामुळे भार्इंदर ते वसई हे ३९ किमीचे अंतर कापण्यासाठी एक तास १७ मिनिटे लागतात. मात्र, हा पूल झाल्यास हे अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार असून, भार्इंदर-वसई ये-जा करण्यासाठी अवघी १० ते १५ पंधरा मिनिटे लागणार आहेत. यामुळे एक तासाची बचत होऊन कोट्यवधींच्या इंधनाची मोठी बचत होणार आहे.>विलंबामुळे खर्च वाढला२०१३मध्ये प्रस्तावित केलेल्या या पुलाचा खर्च ३०० कोटी रुपये गृहीत धरला होता. परंतु, विलंबामुळे तो आता दीड हजार कोटींवर जाणारआहे. मिठागरांसह ३.४४ हेक्टर खारफुटीचा अडथळा आणि पाणजू बेटावरील रहिवाशांच्या विरोधामुळे त्यास विलंब झाला आहे. या पुलामुळे समुद्रातील मासेमारीसह इतर पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.>पाणजू बेटास जोडणारवसई नजिकच्या पाणजू बेटास या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यासाठी ६०० मीटर लांबीच्या आणि साडेआठ मीटररुंद असा दोन रॅम्पद्वारे हा पूल जोडण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामुळे गैरसोय दूर होईल.

टॅग्स :thaneठाणे