सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:50 IST2023-10-11T14:50:26+5:302023-10-11T14:50:49+5:30
आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सावधान! अंबरनाथमध्ये बिबट्या शोधतोय शिकार
अंबरनाथ : गेल्या वर्षी अंबरनाथमध्येबिबट्याने दहशत माजवल्यानंतर तो बिबट्या पुन्हा जुन्नरच्या दिशेने निघून गेला होता. मात्र आता पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
भीमाशंकर अभयारण्यातून गेल्यावर्षी जुन्नर वनक्षेत्र येथून जीपीएस कॉलर असलेला बिबट्या अंबरनाथ, मुरबाड आणि बदलापूर परिसरामध्ये वावरताना दिसला होता. सोमवारी रात्री अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरातील जांभूळ गेस्ट हाऊस परिसरात पुन्हा एकदा बिबट्या नागरिकांच्या दृष्टिक्षेपात पडला आहे.
‘सतर्क रहा’ -
- बदलापूर आणि वांगणी परिसरातही काही महिन्यांपूर्वी असाच एक बिबट्या जंगलात वावरताना दिसला होता. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि मलंगड परिसरात असलेल्या डोंगरावर बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.
- नागरिकांच्याही हा बिबट्या दृष्टिक्षेपात पडला असून वन विभागानेदेखील त्या बिबट्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या नालंबी, चिंचपाडा, वसत, जांभूळ या भागात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.