शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

दादोजी कोंडदेव क्रिडागृहात भिकारी, मजुरांची राहण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:57 IST

महापालिकेने विविध ठिकाणी उभारले निवारा केंद्र

ठाणे : कोरोनाच्या वाढता प्रार्दभाव लक्षात घेऊन देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे भिकारी, रोजदांरीवर काम करणारे कामगार, बेघर, मजुर आदींच्या वास्तव्यासाठी ठाणो महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडा गृहात तब्बल 220 नागरीकांना स्टेशन तसेच शहरातील इतर भागातून आणून त्यांना याठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था पालिका स्वत:च्या तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करीत आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या शाळांमधील असंख्य वर्ग खोल्यादेखील यासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.ठाणो महापालिकेच्या माध्यमातून तसेच पोलिसांच्या मदतीने या सर्व मजुर, कामगार, भिकारी यांचे लॉकडाऊनच्या काळात हाल होऊ नयेत या उद्देशाने पालिकेने ही पावले उचलली आहेत. त्या अनुंषगाने पालिकेने शहरातील दादोजी कोंडेदव क्रिडागृहात तब्बल 220 नागरीकांची या पध्दतीने व्यवस्था केली आहे. त्यांना चहा, नाष्टा, जेवण आदींचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे महापालिका आयुक्त विजय सिघंल यांच्या निर्देशानुसार ही व्यवस्था करण्यात आली असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तसेच शहरातील 9 प्रभाग समिती हद्दीमधील महापालिका शाळांच्या वर्गखोल्याही यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत असलेल्य टेंभी नाका शाळा क्र.5 च्या 8 वर्ग खोल्या, राबोडी शाळा क्र.11 मध्ये 15, शाळा क्र.37 मध्ये 07, कोपरी शाळा क्र. 17 मध्ये 07, पारशीवाडी शाळा क्र. 34 मध्ये 10, परबवाडी शाळा क्र. 18 मध्ये 08, घोलाईनगर - 11, आनंद नगर 08, आतकोनेश्वर नगर 07, कळवा 20, विटावा 18 वर्ग खोल्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शाळा क्र. 78 मध्ये 08, शाळा क्र. 124 मध्ये 15, शाळा क्र.13 व 75 मध्ये 23 वर्ग खोल्या, तर  वागळे प्रभाग समितीत शाळा क्र. 21 मध्ये 51, शाळा क्र. 42 मध्ये 23, शाळा क्र. 32 मध्ये 10, शाळा क्र. 39 मध्ये 12, शाळा क्र. 94 मध्ये 08, दिवा शाळा क्र. 79 मध्ये 11, शाळा क्र. 26 मध्ये 14, 87 मध्ये 10, 85 मध्ये 08, 91 मध्ये 08, 31 आणि 12 मध्ये 60 वर्ग खोल्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत 43 मध्ये 09, शाळा क्र.60 मध्ये 21, शाळा क्र. 52 मध्ये 10, शाळा क्र. 25 मध्ये 21, 55 मध्ये 07, 61 मध्ये 15, 62 मध्ये 11, 128 मध्ये 16, 07 मध्ये 12, 44 मध्ये 24, 65 मध्ये 08, 47 मध्ये 12, 120 मध्ये 24, 46 मध्ये 11 आणि शाळा क्र. 95 मध्ये 19 वर्गखोल्या ठेवण्यात आल्या आहेत.याशिवाय प्रत्येक प्रभाग समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांच्याच देखरेखेखाली या ठिकाणी येणा:या प्रत्येकाच्या निवा:याची सोय करतांना त्यांना खाने, पिणो दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.