शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बील थकले, वीज कट, फोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:22 IST

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत

पालघर : जिल्ह्यातील बीएसएनएलच्या तारापूर केंद्रांतर्गत वीज बिलांची १८ लाख ८६ हजार ३७३ हजारांची रक्कम थकल्याने ८ मुख्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत.तारापूरच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या डहाणूच्या उपविभागीय कार्यालयाची ५ लाख ९७ हजार ३४० रुपयांची थकबाकी असून, उपविभागीय अभियंता विभागाची २ लाख २२ हजार ३१३ रुपये, नरपड (डहाणू) विभागाची २६ हजार ७१०, पालघर (माहीम) च्या उपविभागीय अभियंता विभागाची ३ हजार ५८०, पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ४६ हजार २०० रुपये, बोईसर (आर) उपअभियंता विभागाचे ४६ हजार ११० रुपये, बोईसर (आर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ११ हजार ८१० रुपये तर तारापूर एमआयडीसी मधील कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी कार्यालयाची ९ लाख ३२ हजार ३१० रुपये असे एकूण १८ लाख ८६ हजार ३७३ हजार रु पयांची थकबाकी आहे.महावितरणने बुधवारी एकूण ८ विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा केंद्रासह बँका, शासकीय कार्यालये, सायबर कॅफे, तसेच खाजगी व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. वसई च्या टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाचीही मोठी थकबाकी असल्याने विद्युत वितरण वसई विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील एका अधिकाºयाने काही दिवसाची मुदत मागितल्याने कारवाई टळल्याचे बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील बीएसएनएलच्या बेपर्वाईमुळे दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर, बोईसर, माहीम आदी केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतांशी दूरध्वनी केंद्रासह कार्यालयाची वीजदेयके न भरल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार दूरध्वनी व बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. सर्वत्र कामाचा खोळंबा झाल्याने ओरड सुरू झाल्याने जनरेटर अथवा इन्व्हर्टरच्या आधारावर ही सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून थकबाकी रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.ग्राहकांची पाठ ; शेकडो दूरध्वनी जोडण्या बंदबीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे. एक बाजूला बीएसएनएलची ही अवस्था असतानाच दुसºया बाजूला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने दर आठवड्याला शेकडो दूरध्वनी ग्राहक स्वत:च आपल्या दूरध्वनी जोडण्या बंद करत आहेत.बीएसएनएलच्या या कारभारामुळे येथील इंटरनेट सेवा देखील ग्राहक बंद करू लागले असून ते खाजगी सेवा अथवा केबलनेट सेवेच्या वापराकडे वळत आहेत, बीएसएनएलच्या लँड लाईन सेवे ऐवजी विविध खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे जिल्ह्यातील ग्राहकमोठ्या प्रमाणात वळल्याने त्याचाही आर्थिक परिणाम बीएसएनएलवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विद्युत देयके भरण्याची क्षमताच दिवसेंदिवस कमी होते आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटpalgharपालघर