घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण अखेर सुरू, आमदारांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:56 AM2020-01-24T00:56:22+5:302020-01-24T00:57:31+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे.

Beautification of Ghodbunder fort finally started, inspection by MLAs | घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण अखेर सुरू, आमदारांकडून पाहणी

घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण अखेर सुरू, आमदारांकडून पाहणी

googlenewsNext

ठाणे : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या किल्ल्यात जाऊन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह किल्ल्यातील कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी आणखी काही कामांची सूचना केली.

किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी ८१ लाखांचा खर्च अंदाजित आहे. दुसरीकडे गुरुवारी सरनाईक यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या किल्ल्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी बदलही सुचवले आहेत. यामध्ये घोडबंदर किल्ल्याच्या मूळ अस्तित्वाला धोका न पोहोचवता काम होणार आहे. पुरातत्त्व विभागाने केलेल्या सूचनेनुसार काम सुरू आहे. येथील दुरुस्ती झाल्यानंतर किल्ल्याच्या मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांना बसता येईल, यासाठी जागा तयार करण्यात यावी, घोडबंदर किल्लाच नव्हे तर महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे महत्त्व येथे येणाºयांना समजावे, किल्ल्यात येणाºयांना एकत्र बसून चर्चा करता यावी, यासाठी बैठकीची जागा, किल्ल्याच्या बुरु जाला लागून नैसर्गिक खडक आहे. त्या मोठ्या खडकावर झाडे उगवली आहेत. किल्ल्याचे सुशोभीकरण होत असताना येथील नैसर्गिक वातावरणात शोभिवंत फुलझाडे या खडकावर लावावीत, तसेच या किल्ल्यात असलेल्या हौदात म्युझिकल फाउंटन लावण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे.

घोडबंदर किल्ल्याजवळ खाली डोंगरकडा आहे. नैसर्गिक पद्धतीने हा कडा कापून अ‍ॅम्पी थिएटरप्रमाणे त्यावर बसण्याची व्यवस्था करावी, ती करीत असताना येथे काळे दगड लावण्यात यावीत. याठिकाणी १००-१५० पर्यटक बसू शकतील, अशी व्यवस्था व्हायला हवी. या नैसर्गिक उतारावर बसण्याची सोय केल्यास येथे बसून पर्यटक म्युझिकल फाउंटन, लॅण्डस्केपिंग केलेले गार्डन, किल्ला पाहू शकतील, असे सरनाईक म्हणाले. सध्या मंजूर कामाव्यतिरिक्त जी नवीन कामे सुचवण्यात आली आहेत, त्यासाठीचा खर्च मीरा-भार्इंदर महापालिकेने करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

किल्ला परिसरात असलेल्या झाडांवर हिरव्या कलरचे लाइट इफेक्ट्स द्यावेत, जेणेकरून रात्रीही झाडे सुशोभित दिसतील, तसेच मूळ किल्ल्यावर व्हाइट लाइट (मिल्की शेड लाइट) लावावे, जेणेकरून किल्ला रात्रीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल. याशिवाय, किल्ल्यात प्रवेश करताना एक प्रवेशद्वार उभारण्यात यावे, अशा काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी
यावेळी केल्या.

Web Title: Beautification of Ghodbunder fort finally started, inspection by MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.