परिवहन सेवेच्या चालकास मारहाण; मीरा भाईंदरमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:33 IST2021-12-20T19:33:46+5:302021-12-20T19:33:53+5:30
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकास तिघांनी बस अडवून मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल ...

परिवहन सेवेच्या चालकास मारहाण; मीरा भाईंदरमधील घटना
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकास तिघांनी बस अडवून मारहाण केल्या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
इरफान शेख (४२) रा. डोंगरी गाव, भाईंदर हे बस चालक सोमवारी पहाटे ४. ३० च्या सुमारास उत्तन येथून बस घेऊन भाईंदरच्या दिशेने चालले होते . राई गावातील बस स्थानक जवळ बसच्या मागून आलेले एका दुचाकीवरील तिघा जणांनी शेख यांना शिवीगाळ करत ओव्हरटेक करून पुढे गेले. मुर्धाखाडी जवळ बस आली असता ओव्हरटेक केलेल्या त्या तिघांनी दुचाकी रस्त्यात आडवी लावली. त्या तिघांनी शेख यांना तु बस आडवी का मारली, असे बोलुन बसमध्ये घुसून कॉलरला पकडून मारहाण सुरु केली. त्यांच्या डोक्यावर मारले. त्यावेळी बसमधील वाहक महेष खरात, वाहतुक निरीक्षक व्यंकट जाधव व जितेंद्र म्हात्रे यांनी शेख यांना सोडवले.
सदर या प्रकरणी पोलिसांनी सोनु पटवा, संतोश षेटटी व आदित्य पाटील सर्व रा. नवघर, भाईंदर पूर्व यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर दुचाकी स्वारांनी राई गाव येथे एका कारला समोरून धडक मारल्याने त्यातील सोनू हा जखमी झाला होता.