पिता-पुत्राला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:40+5:302021-02-26T04:55:40+5:30
डोंबिवली : पूर्वेतील शेलारनाका, त्रिमूर्ती नगर वसाहतीत मंगळवारी लग्नाच्या पार्टीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात नाच-गाण्यावरून झालेल्या वादात पिता ...

पिता-पुत्राला मारहाण
डोंबिवली : पूर्वेतील शेलारनाका, त्रिमूर्ती नगर वसाहतीत मंगळवारी लग्नाच्या पार्टीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात नाच-गाण्यावरून झालेल्या वादात पिता जोगिंदर मंगवाना आणि त्यांचा मुलगा अनिल यांना नरेंद्र वैद्य, सुनील वैद्य, अजय कागडा, अजमेर वैद्य यांनी मारहाण केली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
-------
स्कूल बस चोरीला
डोंबिवली : कल्याण-शीळ रोडवरील नेकणीपाडा येथे उभी केलेली नवी मुंबई येथील एका शाळेची बस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील संतोष घनवट यांनी त्यांच्या मालकीची व नेरूळ एसबीओ पब्लिक स्कूलची बस रविवारी रात्री नेकणीपाडा येथील मोटरसायकल शोरूमसमोर उभी केली होती. बसचोरीप्रकरणी मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------
ठाकुर्लीत घरफोडी
डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील ९० फुटी रोडवरील मंगलमूर्ती हाइट्स येथे राहणारे सुशील म्हात्रे यांचे आईवडील बुधवारी दुपारी दिवा येथे गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने बंद घर फोडून घरातील एक लाख ८२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-------------------------------------
मोबाइलची चोरी
कल्याण : पश्चिमेतील बैलबाजार परिसरात राहणारे तन्मय पाध्ये हे बुधवारी रात्री ९.३० वाजता सहजानंद चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी तन्मय यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पलायन केले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------
दुचाकी चोरी
डोंबिवली : मिसम शेख यांनी त्यांची दुचाकी शुक्रवारी खोणी गावातील मशिदीजवळ पार्क केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------