पुलासाठी तुळई टाकण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST2021-03-22T04:36:25+5:302021-03-22T04:36:25+5:30
मुंब्रा : मध्यरेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी रेतीबंदर परिसरातील मुख्य रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी तुळई टाकण्याचे काम शनिवारी ...

पुलासाठी तुळई टाकण्याचे काम सुरू
मुंब्रा : मध्यरेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी रेतीबंदर परिसरातील मुख्य रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या लोखंडी पुलासाठी तुळई टाकण्याचे काम शनिवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नियोजित कामाच्या ५० टक्के काम पूर्ण झाले होते. उर्वरित ५० टक्के काम विहीत वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी तंत्रज्ञ आणि कामगारांचे प्रयत्न सुरू होते. पुलाच्या कामासाठी येथील मुख्य तसेच बायपास रस्ता अवजड आणि हलक्या वाहनांसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला होता. स्थानिक रिक्षा, दुचाकी, रुग्णवाहिकेसाठी खाडीच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडच्या बाजूला कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता, अशी माहिती मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.