शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

विवाहेच्छुकांनी व्हा सावधान; चातुर्मासासह अधिक ज्येष्ठामुळे ५ महिने मुहूर्ताविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 6:49 AM

तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे.

- स्नेहा पावसकरठाणे : तुळशी विवाह नुकतेच उरकले असून आता या दोन महिन्यांत नियोजित असलेल्या विवाहांची लगबग सुरू झाली आहे. तर, अनेकांनी पुढच्या वर्षीच्या दिनदर्शिका विवाह मुहूर्तासाठी चाळायला सुरुवात केली असून विवाह ठरलेल्यांना आणि इच्छुकांना यंदा थोडी घाई करावी लागणार आहे. कारण, पुढच्या वर्षी अर्थात २०१८ मध्ये अवघे ५२ विवाह मुहूर्त आहेत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल २० ते २२ मुहूर्त कमी आहेत.कोणतेही शुभकार्य म्हटले की, सर्वात आधी पाहिला जातो तो मुहूर्त. विवाहासाठी तर अनेकदा आपल्या सोयीनुसार किंवा इतर कारणांमुळे विविध मुहूर्त पाहिले जातात आणि अशा वेळी भरपूर मुहूर्त असतील, तर मग विवाहेच्छुकांची चंगळ होते. परंतु, ते कमी असतील आणि तो साधायचा असेल, तर मात्र झटपट निर्णय घ्यावे लागतात. चालू असलेल्या २०१७ मध्ये सुमारे ७४ विवाह मुहूर्त होते. मात्र, येत्या २०१८ सालात ५२ विवाह मुहूर्त आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक १०, तर त्याखालोखाल मे महिन्यामध्ये ९ मुहूर्त आहेत. फेब्रुवारीमध्ये ८, मार्चमध्ये ७, एप्रिलमध्ये ८, जूनमध्ये ४, जुलैमध्ये ६ असे मुहूर्त आहेत. आॅगस्ट ते नोव्हेंबर या काळात चातुर्मास असल्याने या दरम्यान कोणताही मुहूर्त नाही, अशी माहिती ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. तसेच पौष महिन्यात अर्थात नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात एकही मुहूर्त नाही. तर, पुढील वर्षी अधिक ज्येष्ठ मास येत असून तो १६ मे ते १३ जूनदरम्यान आहे. त्या कालावधीतही एकही विवाह मुहूर्त नाही. अर्थात, याव्यतिरिक्त काही जण आपल्या वेळ आणि सोयीनुसारमुहूर्त काढतात, असेही त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे सुरू असलेल्या २०१७ या वर्षातील उर्वरित नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येही मिळून अद्याप १० विवाह मुहूर्त शिल्लक आहेत. त्यामुळे आता कार्तिकी एकादशीनुसार सुरू होणारी लगीनसराई ही या वर्षअखेरपर्यंत चालू राहणार आहे.महिन्यांनुसार विवाह मुहूर्ताच्या तारखाफेब्रुवारी - ५, ९, ११, १८,१९, २०, २१, २४मार्च- ३, ४, ५, ६, १२, १३,१४एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८,३०मे- १,२,४,६,७,८,९,११,१२जून - १८,२३,२८,२९जुलै - २,५,६,७,१०,१५डिसेंबर - २, १३, १७, १८,२२, २६, २८,२९, ३०,३१

टॅग्स :thaneठाणे