बाप्पाचे विसर्जन खड्ड्याच्या रस्त्यातून, उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी भरले रस्त्यातील खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 17:42 IST2021-09-18T17:41:55+5:302021-09-18T17:42:35+5:30
Ulhasnagar News: महापालिकेने पावसाळ्यापूर्वीं रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे न भरल्याने, बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले

बाप्पाचे विसर्जन खड्ड्याच्या रस्त्यातून, उल्हासनगरात वाहतूक पोलिसांनी भरले रस्त्यातील खड्डे
- सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिकेने पावसाळ्यापूर्वीं रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे न भरल्याने, बहुतांश रस्त्याची दुरावस्था झाली. तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेने सुरू केले असून श्रीराम चौकात वाहतूक पोलीस खड्डे बुजवीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Bappa's immersion pothole road, potholes filled by traffic police in Ulhasnagar)
उल्हासनगरात बाप्पाचे आगमन व विसर्जन खड्ड्याच्या रस्त्यातून होत असल्याने, गणेशभक्त व वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महापालिका कारभारावर झोळ उठविली आहे. दरवर्षी प्रमाणे रस्त्यातील खड्डे पावसाळ्या पूर्वी बजाविले जाते. मात्र गेल्या वर्षी पासून रस्तातील खड्डे पावसाळ्यानंतर व गणेशोत्सवापूर्वी बजाविले जातात. यावर्षी संततधार पावसाने रस्त्याची दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे राहून गेल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली. पालिका बांधकाम विभागावर सर्वस्तरातून टीका होत असून रस्ता दुरुस्ती व खड्डे भरण्याआठी साडे सहा कोटींची तरतूद केली. संततधार पावसाने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अश्विनी आहुजा यांनी दिली.
कॅम्प नं-४ श्रीराम चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असून खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतूक विभागाचे हवालदार एन डी परदेशी व डी एच कोळी यांनी चौक व रस्त्यातील खड्डे भरले. वाहतूक पोलिस श्रीराम चौक रस्त्यातील खड्डे भरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर, त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. पाऊस थांबल्यावर रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्याचे संकेत शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली.