उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By सदानंद नाईक | Updated: January 2, 2025 21:40 IST2025-01-02T21:39:51+5:302025-01-02T21:40:55+5:30
सलमा ही यापूर्वी मुबई येथे तर गेल्या ६ महिन्यांपासून खडेगोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत आहे.

उल्हासनगरात बांगलादेशी महिलेला अटक, शहर गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषण विभागाने खडेगोळवेली गंगा विहार येथून एका बांगलादेश महिलेला अटक केली. आतापर्यंत विभागाने बांगलादेशीना शोधून काढल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाने मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी रोजी कल्याण पुर्व येथील खडेगोळवली गंगाविहार येथून दुपारी साडे चार वाजता वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी तरुणीला जेरबंद केले.
विशेष म्हणजे २०२४ वर्षाच्या डिसेंबर महिन्यात ७ बांगलादेशीना शोधण्याची यशस्वीपणे कामगिरी शहर क्राईम ब्रँचने केल्याने, ही संख्या आता ८ वर गेली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक बबन बांडे, महिला पोलीस कुसुम शिंदे यांनी माहितीच्या अनुषंगाने पंचासह खडेगोळवली मध्ये सापळा कारवाई करून २७ वर्षीय सलमा शेख या तरूणीला ताब्यात घेतले.
सलमा ही गाव- मुस्तफापुर,ठाणा- मदारीपुर, जिल्हा सिक्की, बांगलादेश येथील असल्याचे कागदोपत्रांवरून स्पष्ट झाले. सलमा ही यापूर्वी मुबई येथे तर गेल्या ६ महिन्यांपासून खडेगोळवली येथे बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली.
डिसेंबर २०२४ मध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ बांगलादेशी शोधून त्यांना जेरबंद करण्यात शहर गुन्हे अन्वेषण विभाग यशस्वी झाले. त्या मध्ये २ पुरुष ६ महिला असल्याची माहिती कोळी यांनी दिली आहे.