शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बंदा रुपया ठरतोय टीएमटीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 03:07 IST

बंदा रुपया खणखण वाजतो. परंतु, हाच बंदा रुपया अर्थात नाणी टीएमटी अर्थात ठाणे परिवहनसेवेची डोकेदुखी ठरू लागली आहे.

ठाणे : बंदा रुपया खणखण वाजतो. परंतु, हाच बंदा रुपया अर्थात नाणी टीएमटी अर्थात ठाणे परिवहनसेवेची डोकेदुखी ठरू लागली आहे. यामुळे टीएमटीतून प्रवास करताय, मग सावधान. कारण, तुमच्याजवळ असलेले सुटे पैसे कदाचित यापुढे ठाणे परिवहनसेवा स्वीकारणार नाही. कारण, परिवहनकडे मागील सुमारे तीन वर्षांत जमा झालेली पावणेदोन कोटींची नाणी बँकेने घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आधीच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या परिवहनसेवेपुढे या नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता ती वटवण्यासाठी टीएमटी प्रशासन शहरातील दुकानदारांपर्यंत जाण्याचा विचार करत आहे.परिवहनसेवेच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. त्यातील सुमारे २५० च्या आसपास बस या रस्त्यावर धावत आहेत. त्यामधून रोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करत आहेत. प्रवाशांकडून रोज ३० लाखांच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. त्यात, रोजच्यारोज सुमारे ३० हजारांची नाणी येत आहेत. परिवहनचे तिकीटसुद्धा पाच, आठ, १०, ११, १३, २१ रुपये असे आहे. त्यामुळे प्रवाशांकडून सुटे पैसे मागण्याखेरीज वाहकाला दुसरा पर्याय नसतो. परंतु, आता हेच सुटे पैसे घेणे परिवहनसेवेच्या चांगलेच अंगलट आले आहे. परिवहनकडे मागील तीन वर्षांत या सुट्या नाण्यांतून तब्बल पावणेदोन कोटींच्या वर रक्कम जमा झाली आहे. ती युनियन बँकेत जमा आहे. परंतु, आता याच बँकेने त्यांच्याकडे क्षमता नसल्याने ही नाणी परत घ्यावीत, असे परिवहन प्रशासनाला सांगितले आहे. त्यामुळे एवढ्या नाण्यांचे करायचे काय, ती कुठे ठेवायची, वटवायची कुठे, असा पेच परिवहनला सतावू लागला आहे. आधीच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. उत्पन्न वाढत नसल्याने ताफ्यातील १५० बसची दुरुस्ती करून त्या खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, आता नव्याने या नाण्यांची समस्या निर्माण झाल्याने परिवहनपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.>बेस्ट घेणार ७० लाखयातून मार्ग काढण्याचे आश्वासन परिवहनने बँकेला दिले आहे. तसेच बँकेनेसुद्धा यात काही मदत करावी, अशी मागणी परिवहन प्रशासनाने केली आहे. शिवाय, बेस्ट प्रशासनाला साकडे घातले असून त्यांनी ६० ते ७० लाखांची नाणी घेण्याचे मान्य केले आहे. परंतु, यामध्ये १० रुपयांची नाणी घेण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे १० रुपयांची नाणी आणि उर्वरित शिल्लक राहत असलेली इतर नाणी चलनात कशी आणायची, यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे. यासाठी शहरातील दुकानदार, पतपेढ्या आदींसह इतर व्यावसायिकांपर्यंत जाऊन ही नाणी चलनात आणण्याचा विचार परिवहनने सुरूकेला आहे.>पावणेदोन कोटींची नाणी बँकेने परत घेण्यास सांगितले आहे, हे वास्तव आहे. परंतु, ही नाणी चलनात आणण्यासाठी बेस्ट आणि इतर माध्यमांना आम्ही आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही समस्या सुटेल, असा विश्वास वाटत आहे.- संदीप माळवी, व्यवस्थापक, परिवहनसेवा, ठाणे