- पंकज पाटील, बदलापूर महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्या शरीरात बेकायदा स्त्री बीज वाढविण्याचे आणि त्याची तस्करी करण्याचे रॅकेट बदलापूरमध्ये उघड झाले. या प्रकरणात डॉक्टरांसहआयव्हीएफ सेंटरचाही सहभाग असल्याने पोलिस त्या दिशेने तपास करत असून, किती महिलांची पिळवणूक झाली आहे, याचीही माहिती संकलित करण्यात येत आहे. प्रकरणाचे कनेक्शन देशभर असल्याची शक्यता आहे.
एका महिलेकडून घरात स्त्री बीज वाढविण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स देऊन ते बीज काढून विक्री करण्याचा प्रकार सुरू असल्याचे प्रकरण उघडकीस आले. आरोपी सुलक्षणा जयवंत गाडेकर हिच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजूषा वानखडे यांना अटक केली. त्या एजंट असून, या प्रकरणात मोठे मासे अडकण्याची शक्यता आहे.
१५ ते २० हजार रुपये देऊन केला व्यवहार
स्त्री बीज काढून त्यांची देशभर विक्री होत असल्याचा संशय आहे. विशेषकरून कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यांत त्याची तस्करी केली जात असल्याचा संशयावरून पोलिस तपास करीत आहेत.
या प्रकरणात महिलांना तब्बल १५ ते २० हजार रुपये देऊन त्यांच्या शरीरातील स्त्री बीज डॉक्टरांकडून काढून आयव्हीएफ सेंटरच्या माध्यमातून विक्री केली जात असल्याची शक्यता आहे.
किती महिलांचा सहभाग?
स्त्री बीज तस्करी प्रकरणात काही डॉक्टर आणि इतर काही एजंट अडकण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी ज्या आयव्हीएफ सेंटरची गरज भासत होती, त्या सेंटरचा शोध घेतला जात आहे. याआधी किती महिलांना तस्करी प्रकरणात गुंतवून त्यांची फसवणूक करून स्त्री बीज काढण्यात आले आहेत, याचा पोलिस तपास करीत आहेत.
आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
मुख्य आरोपी सुलक्षणा गाडेकर यापूर्वी वांगणी गावाच्या परिसरात राहत होती. त्या ठिकाणी तिने घरांच्या व्यवहारांत काहींची फसवणूक केल्याचा प्रकार देखील समोर येत आहे. त्यानंतर नऊ महिन्यांपूर्वी वांगणी गाव सोडून बदलापुरात नॅनो सिटीत घर घेतले होते. त्याच घरात हा प्रकार उघड झाला. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी पोलिस पत्रकार परिषद घेऊन संबंधित प्रकरणाचा तपास कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती देणार होते. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य पाहून आणि तपासात अडथळा येऊ नये, यासाठी ती रद्द केली.
तस्करीचे कागदोपत्री नाशिक कनेक्शन
नोंदणीकृत आयव्हीएफ सेंटरमधून हा प्रकार घडत नसल्याची माहिती आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या सेंटरमधून हा प्रकार घडत असल्याची शक्यता आहे. त्याचे कनेक्शन नाशिक शहराशी जोडण्यात येत आहे.
पोलिस आयव्हीएफ सेंटरची तपासणी करीत असून, बनावट पॅन कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे आणि आधार कार्ड तयार करून आयव्हीएफ सेंटरला परवानगी घेतले असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४० महिलांचे स्त्री बीज काढल्याचे समोर येत आहे.
अटक केलेल्या तिन्हीही महिला आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखीन आरोपी लवकरच अटक केले जातील. -सचिन गोरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४
Web Summary : A Badlapur egg trafficking racket, luring women with money, was exposed. Police are investigating the involvement of doctors and IVF centers, suspecting nationwide connections and potential trafficking to southern states. Women were paid for their eggs, sold via IVF centers.
Web Summary : बदलापुर में अंडा तस्करी रैकेट का भंडाफोड़, महिलाओं को पैसे का लालच दिया गया। पुलिस डॉक्टरों और आईवीएफ केंद्रों की संलिप्तता की जांच कर रही है, देशव्यापी कनेक्शन और दक्षिणी राज्यों में संभावित तस्करी का संदेह है। महिलाओं को उनके अंडे के लिए भुगतान किया गया, आईवीएफ केंद्रों के माध्यम से बेचा गया।