शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बदलापूर पालिकेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:02 AM

इमारतीची दुरवस्था; बाहेरुन चकाचक आणि आतून ठिबक सिंचन

बदलापूर : पालिकेचा ३५० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या बदलापूर पालिकेला स्वत:ची प्रशासकीय इमारत अजूनही बांधता आलेली नाही. पालिकेचे कामकाज दुबे रुग्णालयाच्या इमारतीमधून हाकले जात आहे. मात्र या इमारतीचीही नियमित दुरूस्ती केली जात नाही. प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करून पालिकेला देखणे रुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र पालिका कार्यालयाची परिस्थिती बिकट झाली असून अनेक ठिकाणी छत गळत आहे.कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्राचा होणारा विकास हा सर्वांनाच माहित आहे. बदलापूरचा विकास साधण्याची जबाबदारी ज्या पालिकेवर आहे त्या पालिकेच्या कार्यालयाची मात्र पूर्ण वाताहत झाली आहे. मूळात वाढत्या बदलापूर शहरला पालिकेची स्वत:ची इमारत अद्याप बांधता आलेली नाही. पालिकेचे कार्यालय अनेक वर्ष दुबे रूग्णालयातच थाटले आहे. रूग्णालयाची जागा हडप करून हे कार्यालय सुरु आहे.गेली अनेक वर्ष प्रशासकीय इमारतीचा प्रश्न केवळ कागदावरच आहे. कधी निधी नव्हता, तर कधी इमारतीच्या बीओटी प्रकल्पातच भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले. तर कधी निधी येऊन तो परत गेला. या सर्व प्रकारामुळे पालिकेची प्रशासकीय इमारत ही केवळ कागदावरच राहिली आहे. प्रशासकीय इमारतीची जागा निश्चित झाल्यावर नव्याने इमारतीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत जुन्याच इमारतीत कामकाज करावे लागणार असल्याची कल्पना अधिकाऱ्यांना आली आहे. त्यामुळेच पालिकेच्या जुन्या इमारतीला नवे रूप देण्याची धडपड पालिका प्रशासन करत आहे. इमारतीची बाहेरून रंगरंगोटी, प्रवेशद्वाराला अ‍ॅल्युमिनीयम शिट लाउन देखणे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते काम पूर्णही झाले आहे. बाहेरून इमारत छान वाटत असली तरी पालिका कार्यालयातील आतली परिस्थिती ही भयाण आहे.कार्यालयाचे छत गळत असल्याने अनेक ठिकाणी इमारतीच्या भिंतींना ओल पकडली आहे. पालिका सभागृहाची दुरवस्था झाली आहे. सभागृहच्यावर असलेल्या पत्र्यांना गळती लागल्याने सभागृहात लावण्यात आलेले जिप्सन शिट खाली पडली आहे.प्रशासनाकडून उपाययोजना नाहीपालिकेतील इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागत असल्याची कल्पना असतानाही पालिकेने पावसाळ््यापूर्वी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. बाहेरून कार्यालय सुंदर करण्याच्या नादात पालिका अधिकाºयांना स्वत:च्या कार्यालयाची आतली परिस्थिती बदलता आलेली नाही.मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांचे दालन स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात कर्मचारी पुढाकार घेत आहेत. मात्र इतर कार्यालयाची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे समोर आले आहे.सभागृहाच्या छताला गळती लागल्याने ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सभागृहातील कामकाज सुरू असताना दुर्घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर