शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

बदलापूर मॅरेथॉन : सागर, प्रियंका यांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 2:03 AM

सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे.

बदलापूर  - सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेतील ११ गटांत तब्बल सहा हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.१५ आॅगस्टनिमित्ताने बदलापूर शिवसेना शाखेच्या वतीने नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. सलग १६ वर्षे ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे. ११ गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. सकाळी १० वाजता या स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेचा पारितोषिक समारंभ दुपारी १ वाजता गांधी चौकात झाला. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यंदा स्पर्धेदरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खऱ्या अर्थाने ही वर्षा मॅरेथॉन झाली. शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.१० वर्षांखालील मुलांच्या गटात गोविंद चव्हाण आणि सचिन राठोड हे दोघे अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय आले. याच गटातील मुलींच्या स्पर्धेत पायल चव्हाण आणि कविता राठोड या अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय आल्या. १२ वर्षांखालील गटात स्वरूप लोकरे आणि पयपल्ली अ‍ॅनकीयन यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.मुलींच्या गटात दिया मोरे आणि स्रेहा राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अजय जाधव आणि प्रतीक भोपी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात किशोर मोकाशी आणि भाग्यश्री नागाथेंकरे या मुलींनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटात अनिकेत चौधरी आणि व्यंकटेश राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात रेश्मा राठोड आणि वृतिका सोनावणे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत सूर्यवंशी भोसले आणि कंचेखर अवधूत यांनी अनुक्रमे विजेते आणि उपविजेतेपद मिळवले. या स्पर्धेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनbadlapurबदलापूर