शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

बदलापुरात ढोल पथकाचा गोंगाट; रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 23:57 IST

फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला.

बदलापूर : बदलापूररेल्वेस्थानकाचा १६२ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी भाजपा खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेत सर्व नगरसेवकांना कामाला लावले होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा व्हावा, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले होते. त्यानुसार, कार्यक्रमदेखील जंगी झाला. मात्र, उत्साहाच्या भरात ढोल पथकाकडून झालेली चूक ही आयोजक आणि ढोल पथकाच्या अंगलट आली आहे. फलाट क्रमांक-३ वर पथकाने ढोल बडवत आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण केले. हा प्रकार स्थानक प्रबंधक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसमोरच घडला. त्यामुळे आयोजकांसह रेल्वे अधिकारीदेखील गोत्यात येण्याची शक्यता आहे.बदलापूर रेल्वेस्थानकाचा वर्धापन दिन भाजपाने गुरुवारी धूमधडाक्यात साजरा केला. हा कार्यक्रम एका खासगी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमार्फत आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी खासदार कपिल पाटील हे वांगणी येथून बदलापूरला लोकलने आले. त्यानंतर, फलाट क्रमांक-३ वर कार्यक्रमस्थळी सर्व मान्यवर आले. यावेळी रेल्वेस्थानकाचा इतिहास दर्शवणारी चित्रफीतही दाखवली. बदलापूर रेल्वेस्थानकाला स्वच्छतेत तिसरा क्रमांक मिळाल्याने स्थानक प्रबंधकांसह बदलापुरातील रेल्वे कर्मचाºयांचा सत्कार केला. मात्र, कार्यक्रमात गोंधळ झाला, तो ढोल पथकाचा.ढोल पथकातील तरुणांनी उत्साहाच्या भरात फलाट क्रमांक-३ वरील तिकीट खिडकीसमोरच ढोल वाजवण्यास सुरुवात केली. ढोलचा आवाज एवढा जास्त होता की, या आवाजाने ध्वनिप्रदूषणांतर्गत लावलेली मर्यादाच ओलांडली. ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा असताना रेल्वेस्थानकातच तब्बल ८२ डेसिबल आवाजाची नोंद झाली. हा सर्व प्रकार ढोल पथकाकडून अनवधानाने झाला. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा बलासमोर हा सर्व प्रकार घडला. स्थानक प्रबंधक असो वा रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रकार घडत असताना एकानेही त्यावर आक्षेप नोंदवला नाही.रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता ढोल पथकांना स्थानक परिसरात येण्यास बंदी घालण्याची गरज होती. ढोल पथकांचा आवाज वाढलेला असतानाच पुण्याहून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन भरधाव वेगाने गेली. त्या गाडीच्या हॉर्नचा आवाज अनेक प्रवाशांना ऐकू आला नाही. त्यामुळे काही प्रवाशांसमोर अचानक एक्स्प्रेस आल्याने ते घाबरले.या प्रकाराचे काही सजग नागरिकांकडून चित्रीकरण केले जात असल्याचे रेल्वे अधिकाºयांच्या लक्षात येताच त्यांनी हे प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने लगेच ढोल पथकाला आवर घातला. मात्र, आधीच ढोल पथकाला रेल्वेस्थानक परिसरात येण्यास अटकाव न करणाºया अधिकाºयांचा बेजबाबदारपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे. या ढोल पथकाचा आनंद सर्व अधिकारी आणि पोलीस बलदेखील घेत होते. वर्धापन दिनाचा कार्यक्रम ज्या पक्षाने साजरा केला, त्या भाजपालादेखील कारवाईतून वाचवण्याचा प्रयत्न यंत्रणा करत आहे.जबाबदारी ढकललीया प्रकरणाची प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्याचे लक्षात येताच रेल्वेस्थानक प्रबंधकांनी ही जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकली. याप्रकरणी ढोल पथकावर कारवाई केली जाईल, अशी भूमिका रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांनी घेतली आहे.ढोल पथकाकडून रेल्वेस्थानकात ढोल वाजवणे, ही चूकच आहे. असे स्थानकात घडू नये. त्यासंदर्भात रेल्वे सुरक्षा बलाकडून योग्य ती कारवाई केली जाईल.- जितेंद्र झा,स्थानक प्रबंधक, बदलापूर

टॅग्स :badlapurबदलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे