शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
4
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
5
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
7
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
8
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
9
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
10
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
11
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
12
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
13
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
14
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
15
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
16
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
17
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
18
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
19
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
20
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड

बदलापुरातील बाप्पा चालले मॉरिशसच्या प्रवासाला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:09 AM

समुद्रमार्गे पाठवण्याची व्यवस्था : ४0 दिवसांचा प्रवास करणार, मूर्तींच्या मागणीत वाढ

बदलापूर : बदलापुरातील ख्यातनाम आंबवणे बंधू यांच्या गणेश कलाकेंद्रातील गणरायाच्या मूर्ती यंदाही समुद्रमार्गे मॉरिशसला जाणार आहेत. सण आणि उत्सवानिमित्त नागरिकांनी एकत्र यावे, या भावनेतून मॉरिशस येथेही गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आली. या उत्सवासाठी १५ वर्षांपासून गणरायाच्या मूर्ती गणेशोत्सवापूर्वी ४० दिवस आधी मॉरिशस प्रवासासाठी रवाना केल्या जातात, अशी माहिती मूर्तिकार उल्हास आंबवणे आणि समीर आंबवणे यांनी दिली.

बदलापूर, अंबरनाथ येथे दरवर्षी किमान पाच हजार मूर्तींची मागणी असते. ठाणे, मुंबई, रायगड जिल्हा, तसेच महाराष्ट्राबाहेर गुजरात, दिल्ली, भोपाळ, कोलकाता, राजस्थान येथेही आंबवणे यांच्या गणेश कलाकेंद्रातील गणरायांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मॉरिशस येथे गेल्या १५ वर्षांपासून गणेशमूर्ती पाठवण्यास सुरु वात केली आहे. २०१५ साली पूर आल्याने गणेशमूर्ती मॉरिशसला जाऊ शकल्या नव्हत्या. मात्र, तेवढा अपवाद वगळता दरवर्षी मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे.

यंदा जवळपास ३५० मूर्ती मॉरिशससाठी ४० दिवसांच्या प्रवासाला बुधवारी निघणार आहेत. यासाठी आंबवणे यांची केंद्रातील कारागिरांसह दिवसरात्र लगबग सुरू आहे. गणेशमूर्ती जहाजाने पाठवल्या जातात. बदलापूर ते मॉरिशस जलप्रवासाला ४० दिवसांचा अवधी लागतो. एका मोठ्या कंटेनरमध्ये मूर्ती सुरक्षित पोहोचाव्यात, यासाठी विशेष काळजी घेत पॅकिंग केले जाते. यंदा गणेशमूर्तींमध्ये लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ आणि चिंतामणी गणेशमूर्तीची मागणी आहे. याशिवाय, मूर्तीच्या रंगसंगतीतही थोडा बदल केला जातो.

देवीच्या मूर्तीही जाणार सातासमुद्रापारयावर्षी मेटॅलिक आणि रेडियम रंगांना पसंती देण्यात आली आहे. शाडूच्या मूर्तींची मागणी वाढत असून, शाडूच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे उल्हास आंबवणे यांनी सांगितले. गणेशमूर्तींबरोबर नवरात्रोत्सवासाठीदेखील देवीच्या मूर्तींची मागणी मॉरिशस येथून करण्यात आली आहे. सहा ते सात देवीच्या मूर्तीसुद्धा गणरायांबरोबर मॉरिशस प्रवासासाठी निघणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेganpatiगणपती