ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी
By जितेंद्र कालेकर | Updated: June 12, 2025 22:45 IST2025-06-12T22:45:25+5:302025-06-12T22:45:45+5:30
धमक्या दिल्याचा केला आरोप : भाजप नेत्याने आराेप फेटाळले

ठाण्यातील एव्हिएशन प्रशिक्षण संस्थेने केली संरक्षणाची मागणी
- जितेंद्र कालेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील नॅशविल एव्हिएशन या संस्थेचे संस्थाचालक डाॅ. प्रमाेद माेर्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे. संस्थेच्या कार्यालयाचे कॅमेरे बंद करून धमकी देत अडकवून ठेवल्याबद्दल भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह संबंधितांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वाघुले यांनी आपल्यावरील सर्व आराेप फेटाळले असून २२ बेराेजगारांच्या शुल्काचे पैसे त्यांना धनादेशाने परत मागितल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन गुरुवारी स्पष्ट केले.
ठाणे स्टेशन राेड भागात असलेल्या नॅशविल एव्हिएशन या संस्थेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत वाघुले तसेच त्याच संस्थेची माजी केंद्रप्रमुख सना शेख यांच्यावर धमकी आणि मारहाणीचे आराेप केले. या संस्थेत एअरपाेर्ट ग्राउंड स्टाफ प्रशिक्षण, माॅक इंटरव्ह्यू घेत. नाेकरीसाठी साहाय्य केले जाते. संस्थेतील सना हिने अलीकडेच वैयक्तिक कारणामुळे नाेकरी साेडल्यानंतर तिनेच गैरसमज पसरवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. एअरहाेस्टेसच्या नावाखाली लाेडरची नाेकरी दिल्याची माहिती पसरवली. काेर्सप्रमाणेच एअरपाेर्ट ग्राउंड स्टाफ आणि एअरहाेस्टेसच्या जागा आवश्यकतेनुसार भरल्या जातात, असेही शर्मा यांनी सांगितले. दि. ९ जून राेजी वाघुले यांनी आपल्यासह भागीदार प्रशांत सिंग आणि महिला कर्मचारी प्रतिभा भालेराव यांना चार ते पाच तास कार्यालयात अडकवून ठेवत विद्यार्थ्यांच्या शुल्कापाेटीच्या २२ लाखांची मागणी केली. अनेकांचे प्रशिक्षण सात ते आठ महिने झाले हाेते. शिवाय, अचानक ही रक्कम परत करणेही शक्य नव्हते. सना यांनी पाेलिसांसमाेर मारहाण केल्याचा आरोप माेर्या यांनी केला. नाैपाडा पाेलिसांनी वेळीच धाव घेतल्याने आम्ही बचावलाे, परंतु आता भीतीच्या सावटाखाली असल्याने पाेलिसांनी संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
आराेप निराधार - वाघुले
या संस्थेचे सर्व आराेप निराधार आहेत. मुळात त्यांच्याकडे मुलांच्या शुल्काचे पैशांची धनादेशाद्वारे मागणी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतर ही मागणी केली. यात वैयक्तिक काेणताही स्वार्थ नसून मुलांच्या मदतीसाठी आपण त्या ठिकाणी आल्याचा दावा वाघुले यांनी केला. या संस्थेच्या संपूर्ण चाैकशीची मागणीही त्यांनी केली.