फेसबूकवर आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 22:23 IST2017-09-15T22:23:30+5:302017-09-15T22:23:37+5:30
फेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणाºया विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली.

फेसबूकवर आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ
ठाणे, दि. 15 : फेसबूक पेजवर आ. जितेंद्र आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करणाºया विक्रोळी येथील युवकाविरूद्ध नौपाडा पोलिसांकडे शुक्रवारी तक्रार देण्यात आली.
देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षततेची भावना बळावत असल्याचे प्रतिपादन हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती पदाची कारकिर्द संपल्यानंतर केले होते. कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया एका मराठी वृत्तवाहिनीला दिली होती.
वृत्तवाहिनीने आव्हाड यांची प्रतिक्रीया स्वत:च्या फेसबूक पेजवरही प्रसिद्ध केली. आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेचे संमिश्र पडसाद उमटले. विक्रोळी येथील साईनाथ पाटील (वय २४) याने प्रतिक्रीया व्यक्त करताना आव्हाड यांना अश्लिल शिविगाळ करून धमकीही दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाण्याचे अध्यक्ष अभिजीत पवार यांनी शुक्रवारी रात्री यासंदर्भात नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवून युवकाला चौकशीसाठी ठाण्यात बोलविले होते.