औरंगाबादच्या पोलिसाचा ठाण्यात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 00:08 IST2021-07-29T00:06:42+5:302021-07-29T00:08:15+5:30
ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.

ठाण्यातील पदपथावर आढळले आजारी अवस्थेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील जांभळी नाका येथील मार्केटमधील पदपथावर बळीराम शामराव मोरे (४०) हे औरंगाबादचे पोलीस चालक आजारी अवस्थेमध्ये आढळले होते. त्यांना ठाणेनगर पोलिसांनी कळवा येथील शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोरे हे आजारी अवस्थेत २७ जुलै रोजी ठाण्यातील जांभळी नाका पदपथावर ठाणेनगर पोलीस ठाण्याचे बिट मार्शल पोलीस नाईक थविल आणि महाले यांना आढळले होते. त्यांना पोलिसांनी तातडीने कळवा येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सखोल चौकशीमध्ये ठाण्यात फिरस्ता म्हणून आढळलेली ही व्यक्ती औरंगाबाद पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) चालक म्हणून सध्या कार्यरत असून सध्या ते आजारपणाच्या रजेवर (सिक रजा) असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांकडून ठाणे पोलिसांना मिळाली. ठाणेनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.