शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

देवगंधर्व महोत्सवात रसिकांनी, अनुभवला संगीताचा त्रिवेणी संगम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 6:20 PM

देवगंधर्व महोत्सवात विदुषी पद्मा तळवलकर यांचे गायन आणि पं. निलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  सावित्रीबाई फुले नाटय़गृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

डोंबिवली: कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व महोत्सवात विदुषी पद्मा तळवलकर यांचे गायन आणि पं. निलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सावित्रीबाई फुले नाटय़गृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काल रात्री या महोत्सवाचे चौथे आणि शेवटचे पुष्प पद्मा तळवलकर आणि पं. निलाद्रीकुमार यांच्या सतारवादनाने गुंफले गेले. या महोत्सवाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. रागसमयचक्र या स्मरणिकेचे प्रकाशन पद्मा तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रत तळवलकर यांनी भूप रागाने कार्यक्रमाची सुरूवात केली. ग्वाल्हेर, किराणा व जयपूर या तीन घराण्यांचा त्रिवेणी संगम तळवलकर यांच्या गायनातून प्रतित होत होता. आलाप, तानावरील हुकमत नजाकत यामुळे मैफील उत्तरोत्तर रंगत गेली. केदार राग त्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे भजन त्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवाहची दाद मिळविली. कार्यक्रमाच्या दुस:या सत्रत पं. कार्तीककुमार यांचे सुपुत्र निलाद्रीकुमार यांनी सतारवादन केले. त्यांना घराण्यातूनच हे संस्कार मिळाल्याचे त्यांच्या वादनातून जाणवत होते. सतारीवर फि रणारी त्यांची बोटे अचंबित करणारी होती. त्यांच्या सतारवादनाला प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्य़ा वाजवून दाद दिली. निलाद्रीकुमार यांनी प्रथम जोग आलाप, जोड  त्यानंतर बंदिश सादर केली. कामोद व नट यांच्या मिश्ररागातील तिलक रागातील रचना ऐकताना मन हरवून गेले होते. मैफील संपली असतानाच श्रोत्यांच्या आग्रहखातर निलाद्रीकुमार व विजय घाटे यांनी भैरवीची धून  सादर केली. ही धून मनात साठवून प्रेक्षक घरी परतले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली