शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

‘रेरा’अंतर्गत जप्त केलेल्या मालमतेचा उद्या लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 1:25 AM

‘रेरा’ कायद्यांतर्गत जप्त केलेल्या कल्याणमधील आंबिवली येथील बांधकाम प्रकल्पातील मालमत्तेचा सोमवारी लिलाव करण्यात येणार आहे.

टिटवाळा : ‘रेरा’ कायद्यांतर्गत जप्त केलेल्या कल्याणमधील आंबिवली येथील बांधकाम प्रकल्पातील मालमत्तेचा सोमवारी लिलाव करण्यात येणार आहे. कल्याण तहसीलदार अमित सानप यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले आहे.आंबिवली-मोहिली येथे कांबर कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पात तक्रारदार प्रज्ञा साबळे यांनी घर खरेदी केले होते. मात्र, विकासकाने घराचा ताबा वेळेत न दिल्याने त्यांनी ‘रेरा’कडे धाव घेतली. याप्रकरणी रेराने संबंधित मालमत्तेचा लिलाव करून साबळे यांना पैसे परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सोमवारी कल्याण तहसीलदार अमित सानप कारवाई करणार आहेत.साबळे या कळवा येथील रहिवासी आहेत. त्यांनी २०१३ मध्ये मोहिली-आंबिबली येथील कांबर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून २-बीएचके घर घेतले होते. करारानुसार २०१५ मध्ये ताबा मिळणे अपेक्षित होते. ताबा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे साबळे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यायालय आणि रेराकडे धाव घेतली होती. महारेरा मुंबई निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या आदेशानुसार ५१ लाख ८८ हजार ८९० रुपयांची रक्कम व्याज आणि दाव्याच्या खर्चासह वसूल करण्याचे आदेश कल्याण तहसीलदार यांना दिले होते. त्यानुसार, वारंवार नोटिसा बजावूनही वसुली न झाल्याने ५ आॅक्टोबर २०१८ रोजी विकासकाची मोहिली येथील स.नं.३३ /२ ही मालमत्ता जप्त करण्यात आली. महारेरा मुंबई व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवारी या मालमत्तेची विक्री होणार आहे. रेरा कायद्यांतर्गत ठाणे जिल्ह्यात झालेली ही पहिली कारवाई असल्याची चर्चा सुरू आहे.