छत्रपतींच्या शिल्प दुरुस्तीकडे वेधले लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:09 AM2019-12-09T01:09:56+5:302019-12-09T01:10:18+5:30

भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांचा पुढाकार

 Attention to Chhatrapati's craft repairs! | छत्रपतींच्या शिल्प दुरुस्तीकडे वेधले लक्ष!

छत्रपतींच्या शिल्प दुरुस्तीकडे वेधले लक्ष!

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या राज्याभिषेक शिल्पदुरुस्तीकडे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाकडून तब्बल चार वर्षे होणाऱ्या दिरंगाईबद्दल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक शिल्पाच्या दुरु स्तीसाठी २०१५ मध्ये ठामपाच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. मात्र, निविदेतील वादग्रस्त अटींबरोबरच विविध कारणांमुळे निविदा काढण्यात आली नव्हती. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दुसºयाच दिवशी शिल्पदुरु स्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी महापालिका अधिनियम ५(२)(२)अन्वये २० लाखांची तरतूद करण्याचे सांगण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात दोन लाखांपेक्षा अधिक कामाची निविदा मागविण्याबाबत अधिनियमात तरतूद नाही. त्यामुळे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नगरसेवक नारायण पवार यांनी २७ आॅगस्ट २०१९ रोजी पुन्हा आयुक्त जयस्वाल यांचे लक्ष वेधले होते. सात दिवसांत निविदा मागवून काम करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आता आचारसंहिता उठल्यानंतरही कार्यवाही केली जात नसल्यामुळे पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून रखडलेल्या राज्याभिषेक शिल्पदुरु स्तीकडे लक्ष वेधले. सध्या जुने झालेले शिल्प झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र महापौर, उपमहापौर, सभागृह नेत्यांची कार्यालये जवळ असूनही त्याबाबत कोणीही वेगाने हालचाली करीत नसल्याची खंत पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे व्यक्त केली.

पालिका वर्तुळात हालचाली सुरू

भाजपचे गटनेते पवार यांनी ७ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्यानंतर शिवसेनेच्या वर्तुळात हालचाली सुरू झाल्या. त्याआधी ४ डिसेंबर रोजी महापौर नरेश म्हस्के व आयुक्त जयस्वाल यांना पत्र देण्यात आले. मात्र, तीन दिवसांत काहीही कार्यवाही झाली नाही. परंतु, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविताच, महापौर म्हस्के यांनी सायंकाळी फेसबुकवर सकल मराठा क्र ांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असल्याची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सध्याच्या शिल्पकृतीच्या डागडुजीऐवजी दिग्गज कलादिग्दर्शक, शिल्पकार यांचे संकल्पचित्र मागवून नामवंत शिल्पकाराकडून शिल्प बसविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, पवार यांच्या पत्रामुळेच सत्ताधारी शिवसेनेकडून वेगाने हालचाली झाल्या असल्याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Web Title:  Attention to Chhatrapati's craft repairs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.