शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

दिवाळी सणासाठी एटीएममधील रोकड चोरीचा प्रयत्न: दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:50 PM

दिवाळी सणासाठी चक्क एटीएम मशीन फोडून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरज बाथडे (२१) आणि प्रकाश भिकू गांगुर्डे (२४) या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. रोकड चोरता न आल्याने त्यांनी पलायन केले होते. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे हे दोघेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कामगिरी रोकड चोरता न आल्याने केले होते पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लॉकडाऊनमुळे आलेल्या बेरोजगारीमुळे दिवाळीचा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत असलेल्या दोघांनी चक्क एटीएम केंद्रच फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मशीनमधून त्यांना रोकड चोरता न आल्यामुळे त्यांनी एटीएमची तोडफोड करून पोबारा केला होता. वर्तकनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे सुरज बाथडे (२१) आणि प्रकाश भिकू गांगुर्डे (२४) या दोघांनाही नुकतीच अटक केली आहे.हे दोघेही लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील रहिवाशी आहेत. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यामुळे ते बेरोजगार झाले होते. त्यातच दिवाळीचा सण तोंडावर होता. यातूनच एटीएम फोडण्याचा विचार आल्याने ९ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी सावरकरनगर, पाचपाखाडी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. बराच प्रयत्न करूनही त्यांना एटीएमच्या मशिनमधून रोकड काढता आली नाही. त्यामुळे सूरज आणि प्रकाश या दोघांनी या एटीएम मशिनचे नुकसान करून तिथून पलायन केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १० नोव्हेंबर रोजी बँकेने तक्र ार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोकमान्यनगर भागातून सूरज याच्यासह दोघांनाही अटक केली. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी पैशांची निकड असल्यामुळे चोरीचा प्रयत्न केल्याची कबूली या दोघांनी दिल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी