शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:58 AM

येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसºया मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.

ठाणे : येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसºया मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या बंडू सोनावणे याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार करण्यात येत असन फरार हल्लेखोर सलमान याचा शोध सुरू आहे. तर जखमी बंडूची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.चाळीसगाव येथील मूळ रहिवाशी असलेला जखमी बंडू सोनावणे आणि फरार हल्लेखोर सलमान हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर राहत. दोघेही मिळेल ते काम करीत. शनिवारी दोघांनी एकत्र रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, त्याचे बिल फरार सलमान यानेच दिले होते. शनिवारी रात्री झोपण्यावरून त्यांच्यात जागेवरून वाद झाला. बंडूने सलमानला झोपण्यास विरोध केल्याने त्याने दारूच्या नशेत त्याच्यावर रागाच्या भरात कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला सीएसटीकडील एक नंबर फलाटाच्या १०० मीटर पुढे कोपरी येथे घडला. यावेळी हल्लेखोराने डोक्यावर आणि हातावर हल्ले करून तेथून पळून काढला. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत बंडू हा फलाट क्रमांक दोन येथील ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आला. रक्ताने माखलेले पाहून त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डोक्यावर झालेल्या हल्ल्याचे घाव लक्षात घेऊन तातडीने त्याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात हलवले. तसेच याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासात त्यांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील सीसीटीव्ही कॅमेºयामुळे हल्लेखोर सलमानची ओळख पुढे आले आहे. तसेच त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

टॅग्स :Crimeगुन्हा