शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 05:30 IST

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले. न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही.

ठाणे :  राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले. न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चूक आहे, पण पवार हे सत्तेत नसले तरी त्यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील कार्यक्रमात लगावला. एसटी कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होण्यापेक्षा त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता जोतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, तेव्हाच भूमिका मांडली होती की, तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता कोर्टाने संधी दिली आहे. उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजू व्हा. शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खासगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता. मात्र, संपाबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर कोर्टाने आणखी अभय दिले असते, असे आंबेडकर म्हणाले. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना एसटीचे खासगीकरण हवे असल्याचा आराेपही त्यांनी केला. 

सदावर्तेंवरही टीकावकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते, नेते, वकील अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी गुणवंत सदावर्ते यांचे नाव न घेता केली.बेरोजगारी, महागाई लपवण्यासाठी दंगली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती. पेट्रोल, डिझेलचे दरही ८० रुपयांच्या वर गेले नव्हते. मात्र, आजच्या घडीला महागाई बोकाळली असून, त्याकडील लक्ष विचलित करण्याकरिता हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचा आमचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरST Strikeएसटी संप