मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: May 6, 2024 17:22 IST2024-05-06T17:21:49+5:302024-05-06T17:22:41+5:30
मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या विश्वास व विक्की मढवी या बाप-लेकावर रविवारी रात्री सव्वा दहा वाजता खुनी हल्ला झाला.

मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रांगणात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या विश्वास व विक्की मढवी या बाप-लेकावर रविवारी रात्री सव्वा दहा वाजता खुनी हल्ला झाला. याप्रकरणी ७ जणांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात विश्वास मढवी व विक्की मढवी हे बापलेक रविवारी रात्री सव्वा दहा वाजता उपचारासाठी आले होते. उपचार घेऊन मध्यवर्ती रुग्णालय प्रांगणात आले असता, तेथे उपस्थित असलेल्या जितेंद्र देवराज मढवी, रुपेश देवराज मढवी, हेमंत रमेश वायले, सुशांत सुभाष वायले, रोहित सुभाष वायले, चंद्रकांत जनार्धन म्हात्रे व सुभाष वायले या सात जणांनी जुन्या वादातून धारदार शस्त्रखुनी हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेले विश्वास व विक्की मढवी यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील फिर्यादी व आरोपी एकाच गावात राहणारे असून नातेवाईक आहेत. राष्ट्याच्या वादातून दोघांमध्ये भांडण झाल्याचे बोलले जाते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.