अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार; पतीसमोरच नातेवाईकाने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:23 IST2018-08-25T00:22:53+5:302018-08-25T00:23:16+5:30
पीडित पत्नीला तक्रार करण्यास विरोध करणाऱ्या पतीविरोधातही गुन्हा दाखल

अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार; पतीसमोरच नातेवाईकाने केला बलात्कार
बदलापूर : बोराडपाडा भागात आपल्या मावशीकडे गेलेल्या एका अल्पवयीन विवाहितेवर तिच्या पतीसमोरच एका नातेवाइकाने अत्याचार केला. या नातेवाइकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडित पत्नीला तक्रार करण्यास विरोध करणाऱ्या पतीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणानिमित्त आपल्या मावशीच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन विवाहितेवर रात्रीच्यावेळी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकृत पतीसह आरोपी नातेवाइकाला अटक केली आहे. अंकुश घोडके (३८) असे पीडितेच्या नातेवाइकाचे नाव आहे.
पीडितेचा पती हा अल्पवयीन पत्नीसोबत विद्याविहार परिसरात राहतो. पीडिता बदलापूर पश्चिम परिसरातील बोरपाडा येथील इमारतीमध्ये मावशीच्या घरी सणासाठी आली होती. रात्री जेवण झाल्यावर पीडिता पतीसोबत नातलग असलेल्या अंकुश याच्या घरी झोपण्यासाठी गेली होती.
रात्री अंकुशने डाव साधला. या रूममध्ये झोपलेल्या नराधम अंकुशने मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या तोंडाला रूमाल बांधून अत्याचार केला. घटनेच्यावेळी पीडितेने पतीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, झोपेचे सोंग घेऊन त्याने दुर्लक्ष केले.
पतीकडून जीवे मारण्याची धमकी
दुसºया दिवशी सकाळी पीडितेने घडलेल्या प्रकाराबाबत पतीला सांगताच त्याने पोलीस ठाण्यात जाण्यास तक्र ार करण्यास टाळाटाळ केली. उलट, पतीने दमदाटी करत पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली.
अखेर, पीडित पत्नीने आईच्या घरी आल्यावर हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, पीडितेने आईसोबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन नराधम अंकुश व पती या दोघांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.