कोण कोणाची विकेट काढणार?; निवडणूकांपूर्वी इच्छुक उमेदवार बॅनरवर झळकवू लागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 14:54 IST2022-03-29T14:54:38+5:302022-03-29T14:54:51+5:30
निवडणुकीचे तिकीट मिळविण्यासह वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.

कोण कोणाची विकेट काढणार?; निवडणूकांपूर्वी इच्छुक उमेदवार बॅनरवर झळकवू लागले!
मुंबई महापालिकेवर प्रशासक बसला आणि इकडे नगरसेवक माजी झाले. त्यातच आगामी निवडणुकांनी चाहुल दिल्याने इच्छुकांनी डोकी वर काढली. पूर्व उपनगरात सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने तळागाळातील कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले असून, निवडणुकीचे तिकीट मिळविण्यासह वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत.
याचाच एक भाग म्हणून कुर्ल्यात युवा तरुणांनी स्वत:ला भुमिपुत्र म्हणविणाऱ्या पक्षाच्या इच्छुकांना हाताशी धरत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा सुरु केल्या आणि याच माध्यमातून नगरसेवकाची स्वप्न पडू लागलेले इच्छुक उमेदवार या ना त्या कारणाने स्वत:ला बॅनरवर झळकवू लागले आहेत.
कुर्ल्यात याच निमित्ताने लागलेल्या बॅनरवर सध्या इच्छुकांचे चेहरे मोहऱ्यांप्रमाणे झळकू लागले असून, हे बॅनर सगळ्यांच्याच नजरेत भरत असल्याने आता बीएमसी इलेक्शनमध्ये कोण कोणाची विकेट काढणार या चर्चांना ऊत आला आहे.