‘ट्रेड विथ जॅझ’च्या इतरही आरोपींना अटक करा; ठाणे पोलिसांकडे गुंतवणूकदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 05:45 IST2026-02-10T05:45:36+5:302026-02-10T05:45:36+5:30

आराेपीला आमच्या ताब्यात द्या, अशी घोषणाबाजी न्यायालयाबाहेर जमलेल्या ५० ते ६० गुंतवणूकदारांनी केली.

Arrest other accused in 'Trade with Jazz'; Investors demand from Thane Police | ‘ट्रेड विथ जॅझ’च्या इतरही आरोपींना अटक करा; ठाणे पोलिसांकडे गुंतवणूकदारांची मागणी

‘ट्रेड विथ जॅझ’च्या इतरही आरोपींना अटक करा; ठाणे पोलिसांकडे गुंतवणूकदारांची मागणी

ठाणे - लाखोंच्या गुंतवणुकीवर महिन्याला मोठा परतावा देण्याच्या आमिषाने राज्यातील ११ हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरुद्ध साेमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात जमा झालेल्या ८० ते ९० गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त केला. पारदर्शकपणे तपास करून कंपनीची मालमत्ता जप्त करून हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत, अशी मागणीही मुंबई, ठाण्यासह कोकणातून आलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी केली. 

९ फेब्रुवारी २०२४ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये  कंपनीचा संचालक समीर नार्वेकर, अमित बालम आणि संकेत घाग, खारघरचा व्यवस्थापक सागर कदम आणि ठाण्याच्या वागळे इस्टेटचा व्यवस्थापक सौरव बोंडे यांनी ठाणे, चिपळूण, यवतमाळसह राज्यात १६ विविध जिल्ह्यांमध्ये  १,२०० कोटींचा अपहाराची तक्रार करण्यात आली. दरम्यान, कैफियत मांडताना जाधव म्हणाले, कंपनीने त्यांच्याकडून एक कोटीची मागणी करून ९० लाख रुपये घेतले. यातील उर्वरित दहा लाख रुपये दिल्यानंतर करार केला जाणार होता. 

समीर नार्वेकरसह तिघांच्या पाेलिस काेठडीत वाढ
ट्रेड विथ जॅझ (टीडब्ल्यूजे) च्या कंपनीचा  मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी  नेहा नार्वेकर आणि अमित पालम  या तिघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. साेमवारी पाेलिस काेठडीची मुदत संपल्यानंतर पाेलिस बंदाेबस्तामध्ये या तिघांनाही ठाणे न्यायालयात आणले हाेते. आराेपीला आमच्या ताब्यात द्या, अशी घोषणाबाजी न्यायालयाबाहेर जमलेल्या ५० ते ६० गुंतवणूकदारांनी केली. नार्वेकर याच्या कंपनीची  ४७ बँक खाती तसेच त्यांची वैयक्तिक दाेन खाती गाेठविली असून स्वीफ्ट काेड असलेले एका खात्याचीही ठाणे पाेलिसांना माहिती मिळाली. 

तीनच कंपन्या अधिकृत
नार्वेकरच्या १२ कंपन्यांपैकी नऊ पैकी तीनच कंपन्या अधिकृत होत्या. फसव्या कंपन्यांमार्फत तो टीडीएस कपात करून लोकांचे पैसे उकळत होता. टीडीएस घेतल्यानेच लोकांची त्याच्या कंपनीने विश्वासार्हताही मिळविल्याचे पनवेलचे जितेंद्र सैतावडेकर यांनी सांगितले. कंपन्यांमध्ये सर्वसामान्यांसह सुमारे एक हजाराहून अधिक पोलिसांनीही गुंतवणूक केल्याचे बोलले जात आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता असून, पाेलिसांचा तपास सुरू आहे. 

Web Title : ट्रेड विथ जैज़' के अन्य आरोपियों को भी गिरफ्तार करो: निवेशकों की मांग।

Web Summary : निवेशकों ने ठाणे पुलिस से 'ट्रेड विथ जैज़' धोखाधड़ी में शामिल सभी लोगों को गिरफ्तार करने की मांग की, जिसने 11,000 निवेशकों को ₹1,200 करोड़ का चूना लगाया। आरोपियों की पुलिस हिरासत बढ़ाई गई। बारह में से केवल तीन कंपनियाँ आधिकारिक थीं। पुलिस जाँच जारी है।

Web Title : Arrest other 'Trade With Jazz' accused, demand investors to Thane police.

Web Summary : Investors demand Thane police arrest all involved in 'Trade With Jazz' fraud, which duped 11,000 investors of ₹1,200 crores. Accused extended in police custody. Only three of twelve companies were official. Police investigation is underway.