महाराष्ट्र बीएसपीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती

By सदानंद नाईक | Published: December 16, 2023 04:10 PM2023-12-16T16:10:51+5:302023-12-16T16:11:03+5:30

मायावती यांनी गेल्या आठवड्यात लखनौ येथे बैठक घेऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदी परमेश्वर गोणारे याची नियुक्ती केली.

Appointment of And Parameshwara Gonare as State President of Maharashtra BSP | महाराष्ट्र बीएसपीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती

महाराष्ट्र बीएसपीच्या प्रदेशाध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती

उल्हासनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पक्ष प्रमुख मायावती यांनी प्रदेशाध्यक्षपदी परमेश्वर गोणारे यांची नियुक्ती केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव व मुंबई झोन प्रमुख प्रा. प्रशांत इंगळे यांनी लोकमतला दिली आहे. तसेच केंद्रातून खासदार रामजी गौतम यांना राष्ट्रीय समन्वयक व नितीन सिंग यांची महाराष्ट्र समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी गेल्या आठवड्यात लखनौ येथे बैठक घेऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदी परमेश्वर गोणारे याची नियुक्ती केली. तसेच प्रदेश उपाध्यक्षपदी अँड संदीप ताजने यांची नियुक्ती केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव व मुंबई झोन प्रमुख प्रा. प्रशांत इंगळे यांनी दिली आहे. तर राष्ट्रीय समन्वयकपदी केंद्रातून खासदार रामजी गौतम यांची तर नितीन सिंग यांची प्रदेश समन्वयक म्हणून नियुक्ती झाली.

महाराष्ट्र महासचिव व मुंबई कोकण झोन प्रभारी म्हणून डॉक्टर प्रशांत इंगळे यांची नियुक्ती झाली. याव्यतिरिक्त महाराष्ट्राची संपूर्ण कार्यकारणी नव्याने बनवण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश महासचिव व विदर्भ प्रभारी म्हणून अँड सुनील डोंगरे, मराठवाडा झोन प्रभारी व महासचिव पदी मनीष कावळे व महाराष्ट्र महासचिव व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी म्हणून डॉ हुलगेस चलवादी यांची नियुक्ती केली. अशी माहिती प्रदेश महासचिव व मुंबई झोन प्रमुख प्रा. प्रशांत इंगळे यांनी नियुक्ती बाबत माहिती दिली आहे.

Web Title: Appointment of And Parameshwara Gonare as State President of Maharashtra BSP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.