भाईंदरच्या आणखी एका लॉजमधून चालणारा वेश्या व्यवसाय उघडकीस

By धीरज परब | Published: May 9, 2024 10:01 PM2024-05-09T22:01:24+5:302024-05-09T22:02:06+5:30

याप्रकरणी आठ जणांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात ८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Another lodge in Bhayander uncovered a prostitution business | भाईंदरच्या आणखी एका लॉजमधून चालणारा वेश्या व्यवसाय उघडकीस

भाईंदरच्या आणखी एका लॉजमधून चालणारा वेश्या व्यवसाय उघडकीस

मीरारोड - भाईंदर पूर्वीच्या रेल्वे स्थानक समोर असलेल्या इना पॅलेस उर्फ कॅपिटल लॉजिंग अँड बोर्डिंग मधून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे पोलिसांच्या धाडी उघडकीस आले आहे.  याप्रकरणी आठ जणांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात ८ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव व त्यांच्या पथकाने कॅपिटल लॉजिंग वर धाड टाकली. सदर धाडीत लॉजमधून वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघडकीस आले. लॉजचा व्यवस्थापक अरुण देवप्पा सालियन ह्याने वेश्याव्यवसायसाठीची रक्कम स्वीकारली . याप्रकरणी अरुण सालियन ( वय ५० )  सह वेटर सुरेंद्र फरियाप्रसाद यादव ( वय ५० ) ,  आरमा दोराई नाडार (वय ४८ ) , उदय पुजारी, दिनेश पुजारी,  किशोर यादव व रोहित उर्फ आशिष यादव तसेच चालक रविकांत शिवन्ना शेट्टी हे आरोपी आहेत . ह्यातील सालियन सुरेंदर यादव व नाडर ह्या तिघांना अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय केदारे पुढील तपास करत आहेत

Web Title: Another lodge in Bhayander uncovered a prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.