शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जिल्ह्यातील शेतक-यांच्या माथी एमएमआरडीएचा आणखी एक महामार्ग; दोन दिवसात बाजारबोली !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:58 PM

खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला जात आहे.

- सुरेश लोखंडे

ठाणे : खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर जमीन जात आहे. त्यासाठी आगामी दोन दिवसात शासनाकडूनच बाजारभावाने बोली लागणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.विरार ते अलिबाग हा सुमारे ८४ किमी. लांबीचा मिनी महामार्ग तयार करण्याचे काम एमएमआरडीएने युध्दपातळीने हाती घेतले आहे. बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॅरिडोरचा हा महामार्ग थेट अलिबाग बंदरात जात आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासाचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासावर आला आहे. जेएनपीटी कॅरीडोरच्या आधी हा महामार्ग तयार करण्यासाठी सर्व शक्तनिशी काम सुरू आहे. या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यांमधील सुमारे ७० हेक्टर शेत जमीनचा वापर केला जाणार आहे. यासाठी अवघ्या दोन ते तीन दिवसात शेतकºयाच्या या शेत जमिनी बाजारभावाने खरेदी करण्याच्या सूचना जाहीर होणार आहेत. या भावापेक्षा दहा टक्के अधिक रक्कम शेतक-यांना देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.भिवंडीच्या २२ गावांसह कल्याणच्या बारा आणि अंबरनाथच्या हाजीमलंग पट्यातील उसाटणे, नारेन, खोपट, कारोली, पाली, किरक आदी गावांच्या शेतक-यांची शेत जमीन या प्रकल्पात जाणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील या शेतक-यांची सुमारे ३० ते ४० हेक्टर शेतजमिनीवर हा कॉरीडोर तयार करण्यात येत आहे. ८४ किमी.चा हा महामार्ग सुमारे चार पदरी राहणार आहेत. एका वेळी चार वाहने त्यावरून धावणार आहेत. यामुळे ठाणे जिल्हह्यास आता चौबाजुनी महामार्गांनी वेढा टाकल्याचे उघड झाले आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथला जाणार जेएनपीटी महामार्ग आदींना शेती देण्यास विरोध करणाºया शेतक-यांचा अनुभव लक्षात घेऊन आता सरळ बाजारभावाने या जमिनी विकत घेऊन त्यावर अधिक दहा टक्के रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शेतकºयांनी जमिनीच्या मोबदल्यात रक्कम मागावी आणि ती त्वरीत त्यांच्या हाती मिळवून देण्याची शासकीय यंत्रणा सतर्क आहे. त्यासाठी लवकरच संबंधीत शेतक-यांच्या नावांची यादी प्रसिध्द करून त्यांच्या मोबदल्याच्या रकमा देण्यासाठी शासन सर्व शक्तीनिशी सतर्क असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे