अंबरनाथ: अंबरनाथमध्ये परत विकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित आले होते. मात्र आता या गटातून बाहेर पडत राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा राजकीय भूकंप आले आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेसेना आणि भाजपा एकमेकाला शह देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक 12 जानेवारी रोजी होणार असल्यामुळे या पदाकरिता रस्सीखेच सुरू झाली आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्रित येत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीवरून राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण तापल्यानंतर काँग्रेसने आपल्या सर्व नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली.
या कारवाईनंतर काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी भाजपा प्रवेश करत राजकीय भूकंप निर्माण केला होता. या राजकीय भूकंपाला 24 तास उलटत नाही तो या अंबरनाथ विकास आघाडीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे 27, अजित पवार गटाचे चार आणि एक अपक्ष असे 32 नगरसेवकांचे बाळ राहणार आहे. तर अंबरनाथ विकास आघाडीत भाजपाचे 14, काँग्रेसचे निलंबित झालेले 12, एक अपक्ष असे 27 नगरसेवकांचे संख्याबळ राहणार आहे.
Web Summary : In Ambernath, Ajit Pawar's NCP faction exited the Vikas Aghadi alliance and aligned with Shinde's Shiv Sena ahead of Deputy Mayor elections, triggering political shifts. This follows Congress members joining BJP.
Web Summary : अंबरनाथ में, अजित पवार की राकांपा गुट ने विकास अघाड़ी गठबंधन छोड़ दिया और उप महापौर चुनाव से पहले शिंदे की शिवसेना के साथ गठबंधन किया, जिससे राजनीतिक बदलाव शुरू हो गए। इससे पहले कांग्रेस सदस्य भाजपा में शामिल हुए।