लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या ४०३ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ३८ हजार ९३१ तर मृतांची संख्या पाच हजार ८७८ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात २० डिसेंबर रोजी १०५ बाधितांची तर एकाच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे शहरात ५४ हजार १५१ बाधितांची तर एक हजार २८७ मृतांची आतापर्यंत नोंद झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नव्याने ८८ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्युची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत १०३ रु ग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा भार्इंदरमध्ये ३१, भिवंडी महापालिका क्षेत्रात पाच तर उल्हासनगरमध्ये आठ रु ग्णांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्येही १२ नविन रु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यु झाला. बदलापूरमध्ये ३१ रुग्ण दाखल झाले. ठाणे ग्रामीण भागात २० रु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार ६०३ इतकी झाली. तर मृतांची संख्याही ५७७ इतकी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या आणखी ४०३ रुग्णांची नोंद : सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 21:57 IST
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या ४०३ रुग्णांची तर सात जणांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ...
ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या आणखी ४०३ रुग्णांची नोंद : सात जणांचा मृत्यू
ठळक मुद्दे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ३८ हजार ९३१ मृतांची संख्या पाच हजार ८७८