शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह नेतेपदी अनिता गौरी

By admin | Updated: May 6, 2015 01:43 IST

स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे.

ठाणे : स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे. मंगळवारी झालेल्या या निवडीने त्या ठाणे महापालिकेतील पहिल्या महीला सभागृहनेत्या ठरल्या आहेत. मुंबई महापालिकेत तृष्णा विश्वासराव यांची मागील वर्षी सभागृह नेतेपदी निवड झाली होती. तीच परंपरा ठाण्यातही शिवसेनेने कायम ठेवली आहे.गेल्या आठवड्यात रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शयर्तीत माजी महापौर अशोक वैती, नरेश मणेरा, विलास सामंत, दशरथ पालांडे, राम एगडे आदींसह, अनिता गौरी, मीनाक्षी शिंदे, अनिता बिर्जे आदी महिला सुध्दा शर्यतीमध्ये होत्या. अखेर या सर्वांना पिछाडीवर टाकत अनिता गौरी यांनी यात बाजी मारली असून त्यांची मंगळवारी सभागृह नेतेपदी निवड झाली. दरम्यान सुरवातीला अशोक वैती यांचे नाव अंतिम मानले जात होते. परंतु त्यांचे नाव डावलण्यात आल्याने अनिता बिर्जे यांच्यासह मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु अखेर गौरी यांची या पदावर निवड झाली आहे. त्या सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी महापौरपदासाठीही चार ते पाच वेळा आग्रह धरला होता. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्या. विशेष म्हणजे कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतांना गौरी या शिवसेनेतून निवडून येत आहेत. एकूणच उपमहापौर पद कळव्याला दिल्यानंतर आता पुन्हा कळवा पट्यात शिवसेनेला वाढविण्यासाठी गौरी यांची निवड केल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. (प्रतिनिधी)सर्व पदे वागळेलाच का...यापूर्वी सर्वच पदांचा मान हा वागळे इस्टेट आणि कोपरी भागातील शिवसेनेच्या मंडळींनाच मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट असो अथवा, महापौरपदाची लॉटरी आदींसह इतर महत्वाच्या पदांवर देखील वागळे पट्याचाच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सर्व पदे वागळे इस्टेटलाच का असा काहीसा वादही गेले दिवस शिवसेनेत रंगला होता. त्यामुळेच कदाचित आता, वागळे पट्याला वगळून कळव्याला न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केला असल्याचेही बोलले जात आहे. विरोधकांना शांत करणे अशक्यसध्या ठामपात महासभेचा कारभार अनागोंदी पध्दतीने सुरु आहे. कधी काय होईल हे सांगणे एकाही सदस्याला शक्य नाही. प्रत्येक महासभेत विरोधक जेव्हा आक्रमक झाले आहेत, तेव्हा त्यांना शांत करण्याची धमक नरेश म्हस्के यांनी दाखविली होती. तो समन्वय गौरी या कशा साधतात हे पहावे लागेल.