मुदतीत कर्ज न दिल्याचा राग, तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:07 AM2018-02-27T02:07:05+5:302018-02-27T02:07:05+5:30

अश्विन हे ‘एमएम फायनान्स कन्सल्टन्सी’ कंपनीत कर्ज प्रस्तावाची कागदपत्रे स्वीकारून कंपनीत जमा करतात. नंबरदार आणि तौशिक यांनी ११५० रुपये देऊन कर्जासाठी नोंद केली. परंतु, कागदपत्रे न दिल्याने त्यांच्या कर्जाचा प्रस्ताव अश्विन यांनी बँकेकडे पाठविला नाही.

Anger for not giving loan during the tenure, abduction of the youth and the demand for ransom | मुदतीत कर्ज न दिल्याचा राग, तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी

मुदतीत कर्ज न दिल्याचा राग, तरुणाचे अपहरण करून खंडणीची मागणी

Next

ठाणे : मुदतीत कर्ज न दिल्याचा राग आल्याने नायगावच्या एमएम फायनान्स कंपनीतील अश्विन रघुवीर शेट्टी (२३, नालासोपारा) याचे अपहरण करून त्याला २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणाºया मोहम्मद नंबरदार आणि तौशिक शेख यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांना ठाणे न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अश्विन हे ‘एमएम फायनान्स कन्सल्टन्सी’ कंपनीत कर्ज प्रस्तावाची कागदपत्रे स्वीकारून कंपनीत जमा करतात. नंबरदार आणि तौशिक यांनी ११५० रुपये देऊन कर्जासाठी नोंद केली. परंतु, कागदपत्रे न दिल्याने त्यांच्या कर्जाचा प्रस्ताव अश्विन यांनी बँकेकडे पाठविला नाही. त्यामुळे त्यांना मुदतीत कर्ज मिळाले नाही. याचा राग आल्यानेत्यांनी बोगस ग्राहकाच्या नावे २३ फेब्रुवारीला अश्विनला कर्ज प्रकरणाची कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने ठाणे स्टेशनजवळ बोलावले. तो आल्यानंतर मोहम्मद आणि तौशिक यांनी मारहाण करून कारमध्ये कोंबून कल्याणला नेले. तेथील कार पार्किंगच्या जागेवर त्यांना डांबून त्यांच्या खिशातला १४ हजारांचा मोबाईल, १८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने खेचून घेतली.
अश्विनसोबतच त्यांनी मालकीण ममता मलिक हिलाही धमकी दिली. अश्विन आमच्या ताब्यात असून २१ हजार रुपये द्या, नाही तर त्याला आम्ही तोडू, अशी खंडणीची धमकीही त्यांनी दिली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अश्विन यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तौशिकसह दोघांना पथकाने अटक केली.

Web Title: Anger for not giving loan during the tenure, abduction of the youth and the demand for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.