शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

अंगणवाड्यांना ‘आॅनलाइन’ सक्ती

By admin | Updated: October 13, 2016 03:49 IST

अंगणवाडी सेविकांना इंग्रजीसह संगणकाचे पुरेसे ज्ञान नसतांनाही त्यांना सायबर कॅफेतून अंगणवाडीतील उपस्थित विद्यार्थ्यांची इंटरनेटच्या

ठाणे : अंगणवाडी सेविकांना इंग्रजीसह संगणकाचे पुरेसे ज्ञान नसतांनाही त्यांना सायबर कॅफेतून अंगणवाडीतील उपस्थित विद्यार्थ्यांची इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाईन नोंद करण्याची सक्ती केली जात आहे. त्यासाठी लागणारा आर्थिक भुर्दंड ही त्याना सोसावा लागत आहे. यामुळे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्यांनी याविरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी केंद्रात बालकांना शिकवणाऱ्या बहुतांशी सेविका अल्प शिक्षित आहेत. इंग्रजी भाषेचे त्यांना ज्ञान नाही. संगणकाच्या तांत्रिक ज्ञानाचा काही संबंध नसतानाही अंगणवाडीतील उपस्थित बालकांची नोंद ‘एमआयएस’च्या लाईन लिस्टिंग सॉफ्टवेअरव्दारे करण्याची सक्ती केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील व सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी केला आहे. खाजगी सायबरकॅफेत जावून या बालकांची केंद्रनिहाय आॅनलाईन माहिती भरण्याची सक्ती केली जात आहे. यासाठी कमीत कमी येणारा ३० रूपये खर्चही सेविकानाच करावा लागत आहे. तुटपूंजे मानधन तेदेखील वेळेवर दिले जात नाही. याशिवाय आॅनलाईन येणारा खर्च तर त्यांच्यासाठी मोठाच आहे. ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागातील सेविकाना जवळच्या शहरात जाऊन हे काम करावे लागत आहे. हे काम जर मातृभाषेत असेल व त्यासाठी येणारा खर्च मिळत असेल तरच सेविका ही कामे करतील. अन्यथा त्यांच्यावर होणारा हा अन्याय वेळीच दूर करावा, यासाठी साकडे घालण्यात आले आहे.