शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

लोकलमधील चोरीच्या घटनांवर ‘स्क्रीप्स’ची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:54 AM

कडक अंमलबजावणी : पोलिसांच्या वॉचमुळे गुन्ह्यांचे प्रमाण ८५५ ने घटले

पंकज रोडेकर 

ठाणे : लोकल प्रवासात चोरीच्या घटनांची सुसाट ट्रेनच ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत धावत होती. मात्र, तिला आता चांगलाच ब्रेक लागल्याचे दिसत आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मधील घटनांचे प्रमाण हे ८५५ ने कमी झाले आहे. हे प्रमाण प्रभावीपणे रोखण्यात पुणेरी पॅटर्नच्या ‘स्क्रीप्स’ योजनेची मात्रा कामी आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये मोबाइल चोरीप्रकरणी तीन हजार ४६० गुन्ह्यांची नोंद झाली होती. तत्पूर्वी २०१६ साली ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात अवघे ३८८ गुन्हे नोंदवले गेले होते. मात्र, २०१७ पासून गुन्ह्णांचे प्रमाण वाढल्याने २०१८ मध्ये हा आकडा चार हजार ७९६ वर पोहोचला. याचदरम्यान, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र शेनगावकर यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी पुण्यात असताना चोरट्यांवर वचक निर्माण होण्यासाठी ‘स्क्रीप्स’ ही योजना राबवली होती. ती योजना प्रभावी ठरल्याने त्यांनी तिची अंमलबजावणी मुंबई लोहमार्ग आयुक्तालयात प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या योजनेची प्रभावी मात्रा ठरल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या ८५५ ने कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. गुन्हे कमी झाले असले तरी, गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण हे त्या तुलनेत वाढलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.काय आहे योजना...स्क्रीप्स योजनेत प्रत्येक पोलीस ठाण्यात एक विशेष पथक तयार केले आहे. या पथकामार्फत दररोज रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन तो नेमका तेथेच राहतो की, तो तेथून दुसरीकडे राहण्यास गेला आहे, याच्यासह तो नेमके काय करतो, याची इत्थंभूत माहिती घेतली जाते. त्यानुसार, त्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर वॉच ठेवला जातो.मिसिंग एण्ट्री बंदच्लोकल प्रवासात बॅग हरवली. यापूर्वी मिसिंगची एण्ट्री ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेतली जात होती. मात्र, त्या एण्ट्रीसाठी ठेवलेली वहीच आता काढून टाकल्याने त्याऐवजी थेट गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुन्ह्यांचा तक्तासन गुन्हे उघड२०१५ ६१२ २७९२०१६ ३८८ २२८२०१७ ३४६० ३९२२०१८ ४७९६ ४९४२०१९ ३९४१ ४८५

टॅग्स :Raigadरायगडlocalलोकल