शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रुग्णवाहिकांचे बिघडले ‘गणित’

By admin | Updated: December 12, 2015 00:52 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २,४०३ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. मात्र, ही आकडेवारी मागील ३० ते ४० वर्षांपासूनची असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली

पंकज रोडेकर,  ठाणेठाणे आणि पालघर या जिल्ह्यात ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) २,४०३ रुग्णवाहिका नोंदणीकृत आहेत. मात्र, ही आकडेवारी मागील ३० ते ४० वर्षांपासूनची असल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली. त्यामुळे सध्या तरी दोन्ही जिल्ह्यात किती रुग्णवाहिका धावतात हे सांगता येणार नाही. मात्र, दुसरीकडे ठाणे शहरात जवळपास ६० ते ७० रुग्णवाहिका धावत असतील, अशी शक्यताही या सूत्रांनी वर्तवली आहे.हा स्फोट झाला तेंव्हा रूग्णवाहिका बंद होती. त्यामुळे ते वाहन दोषी असेल असे प्राथमिकदर्शी तरी वाटत नाही. परंतु, जर सिलेंडरचा स्फोट झाला असेल तर त्या सिलेंडरला सीसीओईची मान्यता होती का? हे तपासण्याची गरज असल्याचे मत एका आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.वर्तकनगर येथे झालेल्या दुर्देवी घटनेनंतर लोकमतने रूग्णवाहिकांबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही जिल्ह्यांत २,४०३ रूग्णवाहिकांची नोंदणीअसल्याची बाब समोर आली. यामध्ये ठाणे विभागात १५५७ ,कल्याणात ४०२ आणि नवी मुंबई २८९ तसेच वसईत १५५ रूग्णवाहिका आहेत. या रूग्णवाहिका डिझेल-पेट्रोल आणि सीएनजीवर धावतात. तसेच नामंकित संस्थांच्या मान्यतेनुसारच या वाहनांची योग्यता प्रमाणपत्रानुसार त्या रस्त्यांवर येतात. तसेच त्यांची निगा ही प्रामुख्याने त्या मालकाने राखण्याची गरज असते. तर आरटीओकडे तपासणीसाठी आल्यानंतर त्या वाहनांना योग्यतेबाबत प्रमाणपत्र देण्यात येते. तसेच अपघातग्रस्त वाहन नवी मुंबई पासिंगचे असून ते वाहन जुलै २०१४ मधील आहे. तसेच घटना घडली तेव्हा ते बंद होते. त्यामुळे त्यामध्ये दोषी असे वाटत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.