ऑक्सिजनची सुविधा असलेली हवी रुग्णवाहिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 01:01 IST2020-06-21T01:01:18+5:302020-06-21T01:01:31+5:30
खासगी रुग्णवाहिकेचा दर पाच ते सहा हजार असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ऑक्सिजनची सुविधा असलेली हवी रुग्णवाहिका
बदलापूर : बदलापूर पालिका क्षेत्रात कोरोनाबाधिताची प्रकृती खालावल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी आॅक्सिजन यंत्रणा असलेली रुग्णवाहिका गरजेची आहे. मात्र बदलापूर पालिका कोरोनाशी लढत असताना अशा प्रकारची रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. बदलापूर पालिकेने जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या मदतीने सोनिवली येथे केअर सेंटर उभारले आहे. या केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना हलवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे समोर आले आहे. श्वसनाचा त्रास जाणवल्यास त्या रुग्णाला उल्हासनगर किंवा जिल्हा रुग्णालयात हलविण्याची वेळ येते. अशावेळी त्या रुग्णाला आॅक्सिजन असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र पालिकेच्या रुग्णवाहिकेत ही यंत्रणा नसल्याने खाजगी रुग्णवाहिकेची मदत घ्यावी लागते. खासगी रुग्णवाहिकेचा दर पाच ते सहा हजार असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
>कोरोनामुळे दोघांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापलिका हद्दीत कोरोनामुळे शनिवारी दोन जणांचा मृत्यू झाला. परिणामी मृतांची एकूण संख्या ७१ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या दोन जणांपैकी एक जण कल्याण पश्चिमेतील तर दुसरा रुग्ण टिटवाळा परिसरातील आहे. आज नव्याने २४३ रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ३२५७ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १८४८ इतकी आहे. तर उपचार घेऊन बरे झालेल्यांची एकूण संख्या १३३८ इतकी आहे.
‘लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर गुन्हे नोंदवा’
मीरा रोड : मीरा भार्इंदरमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºयाची लूट करणाºया रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे केली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु राज्य सरकारने सर्व महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांनी किती दर आकारावे याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही रुग्णांना वाट्टेल तेवढ्या रकमेचे बिल दिले जात आहे. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे. अशा गैरफायदा घेणाºया रुग्णालयाविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
>जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅक्सिजन यंत्रणा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात मागणी केली आहे. दोन ते तीन दिवसांत रुग्णवाहिका उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
- दीपक पुजारी, मुख्याधिकारी, बदलापूर