Ambernath: इमारत धोकादायक नसतानाही स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू
By पंकज पाटील | Updated: September 2, 2023 16:21 IST2023-09-02T16:21:43+5:302023-09-02T16:21:59+5:30
Ambernath News: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट मधील स्लॅप कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक कुटुंबातील सदस्य जखमी झाला आहे.

Ambernath: इमारत धोकादायक नसतानाही स्लॅब कोसळला, महिलेचा मृत्यू
- पंकज पाटील
अंबरनाथ - अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेच्या शेजारी असलेल्या अण्णा सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅट मधील स्लॅप कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक कुटुंबातील सदस्य जखमी झाला आहे.
शनिवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान अण्णा सोसायटीतील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने या स्लॅब खाली झोपलेल्या गीता गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अण्णा सोसायटी ही पालिकेच्या धोकादायक इमारतीच्या यादीत नसताना देखील घटना घडल्याने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. या इमारतीमधील काही स्लॅब हे अजूनही धोकादायक अवस्थेत आहे. स्लॅब मधील लोखंडी सळई पूर्णपणे गंजले असून त्या गंजलेल्या स्लॅप मुळेच अपघात घडत असल्याची बाब समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे इमारतीमधील रहिवासी धास्तावले आहेत.