शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

शहरातील अन्य भागांतील बेकायदा बांधकामेही तोडा;भाजपची आयुक्तांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 00:43 IST

गायींना ठेवण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी

मीरा रोड : महापालिकेने सोमवारी भार्इंदर पूर्वेतील आरएनपी पार्क भागात सीआरझेडमध्ये कांदळवनालगत झालेल्या भल्या मोठ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यानंतर मंगळवारी भाजप नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. बेकायदा बांधकाम तोडले, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही; पण गोवंश व त्यांचा चारा आदी बाहेर काढायला पुरेसा वेळ दिला पाहिजे होता, असे आयुक्तांना सांगतानाच शहरातील सीआरझेड बाधित झोपडपट्ट्या, चाळी, बंगले आदींवर तोडक कारवाई करा, अशी मागणी केल्याचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हा सचिव आणि ज्येष्ठ कार्यकर्ते कमलाकर घरत यांच्यासह मनसे आदींनी आरएनपी पार्कच्या सीआरझेडमधील कांदळवनालगत काम सुरू असलेल्या बांधकामावर कारवाईसाठी तक्रारी केल्या होत्या. पालिकेने हे बांधकाम थांबवण्याचे बजावत याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला होता. सोमवारी पालिकेने सदर बांधकाम जमीनदोस्त केले.

बांधकाम तोडण्या वरुन भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता व महापौर डिंपल मेहता हे आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारून होते.मंगळवारी भाजपच्या नगरसेवकांसह काही संस्थांचे प्रतिनिधी, विश्व हिंदू परिषद पदाधिकाऱ्यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांची भेट घेतली. विश्व हिंदू परिषद आणि काही संस्थांच्या पदाधिकाºयांनी यावेळी आयुक्तांना निवेदन दिले. उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्यासह परिवहन सभापती मंगेश पाटील, गटनेते हसमुख गेहलोत, नगरसेवक ध्रुवकशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, मुन्ना सिंह, अशोक तिवारी, डॉ. सुशील अग्रवाल, दिनेश जैन, अनिल विराणी, माजी नगरसेवक भगवती शर्मा व आसिफ शेख, नगरसेविका शानू गोहिल, वंदना पाटील, सुनीता भोईर उपस्थित होते.

बेकायदा बांधकाम तोडल्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही, पण आतील जनावरांना तसेच चारा बाहेर काढण्यास वेळ दिला गेला नाही. जनावरे बिथरल्याने दोन गायींना इजा झाली. याप्रकरणी संबंधित जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करा तसेच या गायींना ठेवण्यासाठी पालिकेने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्याचे ध्रुवकिशोर यांनी सांगितले. आयुक्तांनी कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.

नयानगरमध्ये अनेक बेकायदा बांधकामे आहेत. भार्इंदरमध्ये गणेश देवलनगर, जय अंबेनगर, मुर्धा, राई, मोर्वा आणि हायवे पट्ट्यातही सीआरझेडमध्ये झोपडपट्ट्या, चाळी बांधण्याची कामे सुरू आहेत. उत्तन येथे बंगले बांधले जात आहेत. तिकडेही पालिकेने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांनी केली आहे.

राजकीय द्वेषातून कारवाईचा आरोप

आरएनपी पार्क येथील गोशाळेवर केलेली कारवाई ही राजकीय द्वेषाने केलेली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नरेंद्र मेहता जोपर्यंत आमदार होते तोपर्यंत पालिकेने कारवाई केली नाही. निवडणुकीत मेहता हरल्यानंतर मात्र तोडक कारवाई केली हा राजकीय द्वेष म्हणायचा नाही तर काय? असा सवाल ध्रुवकिशोर यांनी केला. मेहतांचे निकटवर्तीय भगवती शर्मा यांनीही बेकायदा बांधकाम तोडले त्याचे आम्हाला काही देणे-घेणे नाही. पण गायींना सुखरूप काढले पाहिजे होते. हा भाजपचा राजकीय मुद्दा नसल्याचे शर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे