शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
4
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
5
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
6
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
7
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
8
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
9
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
10
Mhada: पैसे घेतले, पण घर दिलेच नाही; म्हाडाच्या एजन्सीनेच लोकांना फसवले!
11
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
12
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
13
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
14
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
15
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
16
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
17
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
18
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
19
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
20
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...

पैसे वाटपाचा आरोप; भाजपच्या नेत्याच्या मुलाला कोपरखैरणेत मारहाण, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 11:53 IST

बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला.

नवी मुंबई : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी स्वराज्य पक्षाचे ऐरोलीचे उमेदवार अंकुश कदम यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. कदम यांच्यासह साथीदारांवर कोपरखैरणे पोलिस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाच्या हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत कदम व त्यांच्या साथीदारांनी भाजपच्या बूथवर केलेल्या हल्ल्यात हा प्रकार घडला. 

बुधवारी दुपारच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर ५ येथे भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला. मोरे यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा आरोप स्वराज्यच्या पदाधिकाऱ्याने निवडणुकीच्या भरारी पथकाकडे केला होता. तक्रारीनुसार पथकाने त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता काही मिळून आले नाही. 

दरम्यान, त्यांच्या कार्यालयाबाहेरच स्वराज्य पक्षाचा एक पदाधिकारी उभा राहून लक्ष ठेवत असल्याने मोरे यांनी त्याच्याकडे उलट चौकशी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला असता काही वेळात अंकुश कदम हे साथीदारांसह त्या ठिकाणी आले होते. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक वाद होऊन झालेल्या मारहाणीत जयेश मोरे जखमी झाला. 

दोन्ही गट समोरासमोर आले असता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. कार्यकर्त्यानी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविली असून वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

राज्यात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत म्हणजे  १५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबरदरम्यान राज्यभरात ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण १० हजार १३९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी १० हजार १३४  तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने बुधवारी दिली.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू, आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024airoli-acऐरोलीBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी