शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

ठाण्यातील पालिका शाळांच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या ‘अक्षयपात्र’ माध्यान्ह भोजनाची वर्षपूर्ती

By जितेंद्र कालेकर | Published: August 01, 2018 10:19 PM

देशभरात नावाजलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. सकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा लागल्याचे शिक्षक सांगतात.

ठळक मुद्दे पवारनगर येथील जागेत साकारले भव्य स्वयंपाकगृह२६ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्थासकस ताज्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा लळा

जितेंद्र कालेकरठाणे : संपूर्ण देशभर विस्तार असलेल्या ‘अक्षयपात्र’ या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार ८६६ विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवले जाते. नियमित आणि पुरेशा मिळणाऱ्या या माध्यान्ह भोजनाच्या निमित्तानेही महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागल्याचे अनेक पालक सांगतात.विद्यार्थ्यांना भोजन देणा-या या संस्थेला पवारनगर येथे पालिका प्रशासनाने शाळा क्रमांक १३३ ची जागा दिली. जुन्या पडक्या शाळेच्या जागेचा कायापालट करून संस्थेने काही सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने भव्य अत्याधुनिक स्वयंपाकगृह उभारले. आॅगस्ट २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या ‘अक्षयपात्र’मुळे गरीब सामान्यवर्गातील मुलांना आधार मिळाला आहे. आता त्याची वर्षपूर्ती होत आहे.याठिकाणी मुलांना त्यांच्या ऐन जेवणाच्या वेळेत गरम, आरोग्यवर्धक, प्रोटीनयुक्त आहाराची पॅकेट्स पुरवली जातात. डाळ, भात, भाजी आणि चपाती अशा आहाराच्या पॅकेटचा यात समावेश असतो. ठाणे शहरातील भार्इंदरपाड्यापासून अगदी येऊरच्या पाटोणपाड्यापर्यंतच्या शाळेतील मुलांना हा आहार अत्याधुनिक वाहनांमधून पुरवला जातो.पहाटे ५ पासून सुरू होणा-या या अत्याधुनिक स्वयंपाकगृहात सर्व पदार्थ बनवण्यासाठी अद्ययावत यंत्रणा उभारलेली आहे. गव्हाच्या पिठाच्या कणकेपासून चपातीची प्रक्रिया होईपर्यंतचे सर्व काम मशीनवर होते. त्यामुळे अवघ्या तासाभरातच तीन हजार चपात्या याठिकाणी तयार केल्या जातात. भाजी कापणीपासून वरण हटवण्यापर्यंची सर्व कामेही यंत्राद्वारे होत असल्यामुळे अवघ्या १५ ते २० कर्मचा-यांमध्ये हा स्वयंपाक तास ते दीड तासात तयार होतो. अक्षयपात्रने ठाण्यात राबवलेल्या या उपक्रमाला ठाण्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे ‘अक्षयपात्र’ च्या ठाण्यातील व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळाtmcठाणे महापालिका